Add

Add

0
शिवशाहीर पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून
 पद्मविभूषण पुरस्‍कार प्रदान

            पुणे(प्रतिनिधी ) : - बळवंत मोरेश्‍वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या हस्‍ते पद्मविभूषण पुरस्‍कार त्‍यांच्‍या निवासस्‍थानी आदरपूर्वक प्रदान करण्‍यात आला. पुरंदरे यांना भारत सरकारने सन 2019 मध्‍ये पद्मविभूषण पुरस्‍कार जाहीर केला होता. 11 मार्च 2019 रोजी झालेल्‍या पुरस्‍कार प्रदान सोहळ्यास वैयक्तिक कारणास्‍तव श्री.बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहू शकले नव्‍हते.त्‍यामुळे जिल्‍हा धिकारी राम यांनी त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन पद्मविभूषण पुरस्‍कार ( पद्म विभूषण पदक, मिनिएचर व सनद (प्रमाणपत्र) आदरपूर्वक प्रदान केला. यावेळी तहसिलदार तृप्‍ती कोलते-पाटील यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top