Add

Add

0
सिद्धबेट तपोभूमीतून स्थानिक जैव-विविधता संवर्धनआळंदी परिसरातील  पुरातन जलकुंड  व कुबेरगंगेचे पुनुरुज्जीवन व सामुहिक पसायदान मागून संकल्प मेळावा साजरा...

               आळंदी (प्रतिनिधी ):- इंद्रायणी-कुबेरगंगा या नद्यांच्या संगमावर असलेली पुरातन तपोभूमी “सिद्धबेट” म्हणजे साक्षात निसर्गपीठ-शिवपीठ आहे.  सिद्धबेट हि श्री संत निवृत्तीनाथश्री संत ज्ञानेश्वर महाराजश्री संत सोपानकाका व चित्कला मुक्ताई यांची जन्मभूमीकर्मभूमी व लीलाभूमी म्हणून प्रचीलीत आहे. चौरांशी सिद्धांच्या तेजस्वी साधनेने संस्कारित व सिद्ध झालेली हि पुरातन तपोभूमी आहे. स्वयं शिव-पार्वतीचे येथे वास्तव्य होते असे अनेक दाखले आहेत. श्री इंद्रदेवश्री कुबेर यांनी व इतर अनेक संत-महात्मांनी या तपस्थळी तप केलेले आहेत. विशाल अशा भक्तीसंप्रदायाच्यातत्वज्ञानाचा पाया देवून भक्तीला प्राधान्य देवून जीवसृष्टीमध्ये भगवंत पाहणे हा सहज भक्तीभाव असलेला सर्वमान्य वारकरी संप्रदाय प्रवाहित केलाअशी तपोभूमी म्हणजे सिद्धबेटहा भागवत धर्माचावारकरी संप्रदायाचा चिरंतन वारसा आहे.  आजही तपस्वीसाधकवारकरी संप्रदायभाविकनिसर्ग-अभ्यासकजनसामान्य या तपोभूमीचा वात्सल्य सहवासाचा आनंद व कृपाशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने जमतात. या साधनास्थळी अनेक पुरातन मंदिरे,समाधी व पुरातन जल-कुंड देखील आहेत. या अध्यात्मिक वारस्याबरोबरच या बेटावरची जैव-विविधता देखील विलक्षण आणि वैचित्रपूर्ण आहे. भारतदेशाचा अध्यात्मिक व  नैसर्गिक वारसा असणारा ज्ञानवृक्ष-अजानवृक्ष व त्याची वैशिष्टपूर्ण दाट राई हे या बेटाची खरी निसर्गसंपत्ती आहे व त्याला एका अर्थाने देवराईचेच स्वरूप आले आहे. अश्या पद्धतीची या वृक्षाची विस्तृत पसरलेली राई भारतात कुठेच आढळून येत नाही. या वृक्षा-बरोबरच या बेटावर अनेक वैविध्यपूर्ण स्थानिक-देशी वनस्पतीप्राणी-पक्षीकीटक,सरीसृपजलचर मोठ्या संखेने आढळून येतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर असलेला ज्ञानवृक्ष-अजानवृक्ष गेली अनेक शतके जनमाणसांना प्रेरित करीत व आत्मशक्ती देत आहे. संत साहित्याचा अभ्यास केला असता श्री संत ज्ञानेश्वर माऊली व अजानवृक्ष यांचे दृढ नाते लक्षात येते. श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांनी देखील समाधिस्त होण्यापूर्वी जो दंड रोवला होता तो देखील सिद्धाबेटावरील अजानवृक्षाचाच होता हीदेखील एक विशेष बाब आहे. यावरून सिद्धबेट ही माऊलींची जन्मभूमीआळंदी येथील त्यांची संजीवन समाधी व अजानवृक्ष हे एक समीकरणच झाले आहे.
                एकुणातच काय या पर्यावरणीयजैव-विविधता विषयक व अध्यात्मिकदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या या तपोभूमिच्या संवर्धनासाठी तसेच आपल्या संस्कृतीपरंपरेमधल्या महत्वाच्या स्थानाबाबत जनमानसात काही अंशी जाण वाढावी. तसेच या निसर्गपिठाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावाजनमानसात जैवविविधता व अध्यात्माबाबत योग्यती सकारात्मकता यावी या उद्देशाने या निसर्गपिठाला कायमचे संरक्षण व संवर्धन मिळावेसिद्धबेट-आळंदी परिसरातील पुरातन कुंडाचे पुनुरुज्जीवन व्हावे व इंद्रायणी-कुबेरगंगा पुन्हा स्वच्छ निर्मळ वहाव्यात या उद्धेशाने रविवारी 12 मे 2019 ला जागितक मातृदिनाचे औचित्य साधून सकाळी 9.30 ते 11.30 वेळेत अजानराईसिद्धबेट-गोपाळपुराकेळगाव-आळंदी येथे संकल्प मेळावास्वच्छता अभियान व सामुहिक पसायदाननामस्मरण व ध्यान करण्यात आले. या संकल्प मेळाव्यास ह.भ.प. डॉ. यशोधन महाराज साखरे (साधकाश्रम,आळंदी)ह.भ.प. माणिक महाराज मोरे (विश्वस्तसंत तुकाराम देवस्थानदेहू)ह.भ.प. मधुकर महाराज मोरे (अध्यक्षसंत तुकाराम देवस्थानदेहू)ह.भ.प. रंगनाथ नाईकडे (वनसंरक्षकसा. व.पुणे)श्री. समीर भूमकर (मुख्याधिकारीआळंदी नगरपरिषद) सौ. सोनालीताई मुंगसे (सरपंचकेळगाव)श्री. गणपतराव कुऱ्हाडे पाटील (अध्यक्षइंद्रायणीमाता सेवा संघआळंदी)वारकरी संप्रदाय,अनेक सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधीनिसर्गप्रेमी-अभ्यासकस्थानिक ग्रामस्थभाविकसाधकअधिकारीपत्रकार व जनसामान्य मोठ्या संखेने उपस्थित होते. साधकाश्रम-आळंदी येथील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. सदर मेळाव्याचे औपचारिक उदघाटन अजानवृक्षालाविठ्ठल-रुक्मिणीच्या चरणांनाशिवलिंगाला गंगाजलार्पण करून झालेतसेच या वेळी अजानवृक्षाच्या बाबतीत विस्तृतसचित्र माहिती असलेल्या हरित फलकाचे अनावरण देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व तुलसी रोपांचे वाटप देखील करण्यात आले. मेळाव्यात सर्वच मान्यवरांनी या हरित-उपक्रमाबाबत मौलिक विचार मांडलेतसेच पुढील उपक्रमाची दिशा व उद्धीष्ट्ये ठेवून कसे सातत्याने कार्यरत राहिले पाहिजे या बाबत मार्गदर्शन केले. संत विचारत्यांच्या साहित्यातील पर्यावरण,शासनाच्या विविध योजनाजलकुंडांचीनदीची सद्य-परिस्थितीजैव-विविधतापरिसरात व इतर ठिकाणी चालू असलेल्या हरित-उपक्रमांबाबत देखील उहापोह या मेळाव्यात करण्यात आला.
                सदर उपक्रम हा बायोस्फिअर्सविचारक्रांती अभियानरोटरी क्लब पुणेप्रभातस्थानिक ग्रामस्थ व समस्त वारकरी संप्रदाय यांनी संयुक्तीकपणे आयोजित केला होतातसेच या हरित-अभियानात सहभागी होण्यासाठी आपण खाली नमून दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधू शकता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लब ऑफ पुणे-प्रभातचे श्री. अतुल सलाग्रे यांनी केले. प्रस्तावना बायोस्फिअर्सचे  डॉ. सचिन पुणेकरश्री. दत्तात्रय गायकवाड व विचारक्रांती अभियानाचे श्री. शैलेंद्र पटेल यांनी केली. आभार श्री. गणेश कलापुरे यांनी मानले. तरी वर नमूद सर्व अध्यात्मिकसांस्कृतिक व पर्यावरणीय पार्श्वभूमी लक्षात घेता आम्ही आपणास विनंती करतो की वर नमूद विषयक जागृत आणि संवेदनशील असलेल्या आपल्या वृत्तमाध्यमातून या अनोख्या हरित-अभियानाबाबत अधिकाधिक लोकापर्यंत पोहचता यावे या प्रामाणिक आणि नम्र विनंतीसह...

Post a Comment

 
Top