Add

Add

0
झाकीर नाईक यांच्या संघटनेवर बंदीमग त्यांच्या
फेसबूक खात्यावर का नाही ? - हिंदु जनजागृती समिती
  पुणे(प्रतिनिधी ):-आतंकवादाचे उघडपणे समर्थन आणि आतंकवादी विचार पसरवणा र्‍या डॉ.झाकीर नाईक यांच्या‘इस्लामिक रिस र्च फाऊंडेशन’वर 17नोव्हेंबर 2016या दिवशी भारतात केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आलीत्यानंतरही डॉ.नाईक यांच्या भाषणां तून प्रेरणा घेत आतंकवाद्यांनी बांगला देशा तील ढाका आणि नुकतेच श्रीलंकेत स्फोट घडवल्याचे समोर येत आहेअंमलबजावणी संचालनालयाला डॉनाईक यांची 193 कोटी रुपयांची अवैध संपत्ती सापडल्याचे न्यायालयात नुकतेच दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहेतसेच केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याकडे झाकीर नाईकचे साहित्य सापडल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहेत्यामुळे झाकीर नाईक हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे जर भारत सरकारचे म्हणणे आहेतर त्याच्या स्वतःच्या आणि त्याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संघटनेच्या फेसबूक खात्यांवर सरकारने आजही बंदी का घातलेली नाही फेसबूकसारख्या प्रभावी सोशल मीडियातून जर झाकीर नाईकला प्रचार करू दिला जात असेलतर त्याच्यावर घातलेली बंदी ही दिखाऊच मानावी लागेलत्यामुळे झाकीर नाईक आणि त्याच्या संघटनेच्या फेसबूकसह अन्य सोशल मीडियाच्या खात्यांवर त्वरित बंदी घालावीअशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीरमेश शिंदे यांनी केली आहे.
    केंद्रशासनाने बंदी आणल्यानंतर विद्यमान कायद्याप्रमाणे त्या संघटनेला वा तिच्या कार्यकर्त्यांना त्या संघटनेसाठी कार्य करता येत नाही.असे असतांनाही आजही डॉझाकीर नाईक यांच्या फेसबूक खात्यावर 1कोटी 70 लाख,तर त्यांच्या‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेच्या फेसबूकवर 60 लाख अनुयायी कार्यरत आहेतहिंदु जनजागृती समितीने या दोन्ही फेसबूक खात्यावर बंदी आणण्यासाठी 5जून 2017या दिवशी केंद्रीय गृह खाते,गृहसचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली होतीनवी दिल्ली येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री.हंसराज अहिर यांना प्रत्यक्ष भेटूनही निवेदन दिले आहेत्याला दोन वर्षे होत आली आहेततरी सरकार अद्याप त्यावर कारवाई का करत नाही ?, हा आमचा प्रश्‍न आहेबांगलादेश आणि श्रीलंका यांच्याप्रमाणे भारतात आतंकवादी हल्ले होण्याची शासन वाट पहात आहे का ?,असा प्रश्‍नही श्री.शिंदे यांनी विचारला आहे.

Post a Comment

 
Top