Add

Add

0
                    नाशिकच्या Warned फिल्मचा मुंबईत झेंडा... 

मुंबई (प्रतिनिधी ):-तेजस फाऊंडेशन द्वारा आयोजित लघुचिञपट महोत्सव दि. 01 मे 2019 रोजी कर्मविर दादासाहेब गायकवाड सभागृह ,अंधेरी,मुंबई येथे दिमाखात पार पडला. यात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध विषयांवरील लघुचिञपटांचा समावेश होता. अटतटीच्या झालेल्या स्पर्धेत एस ॲण्ड एस फिल्म्स द्वारा निर्मित, डाॅ. शैलेंद्र गायकवाड लिखीत आणि समीर रहाणे दिग्दर्शित "warned" या लघुचिञपटाने " *सर्वोत्कृष्ट लघुचिञपट* " या श्रेणीमधे द्वितीय क्रमांक पटकावून बाजी मारली.
 सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वाॅर्नड या लघुचिञपटामधे स्वप्नील राणे, अभिजित राणे, डॉ शैलेन्द्र गायकवाड, प्रशांत शिंदे, शितल भामरे आणि बालकलाकार सारा आरोटे यांनी प्रमुख भूमिका बजावल्या आहेत. या लघुचिञपट निर्मितीसाठी अनिरुध्द म्हस्के, किरण देशमुख, प्रशांत पगार, रजनिश गायकवाड, प्रसाद दाभाडे, योगेश आरोटे, महेश कावळे, ललित कुलकर्णी आदींचे सहकार्य लाभले.
 "पाणी वाचवा जीवन वाचवा" या मध्यवर्ती संकल्पनेवर हा लघुपट आधारित होता. सदर लघुचिञपटाच्या यशाच्या निमित्ताने नाशिकच्या कलावंतांची दखल मायानगरी मुंबईत घेण्यात आल्याने संबंधित चमूचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना लवकरच अजून काही सामाजिक विषयांवरील लघुचिञपटांची निर्मिती होत असल्याचे एस ॲण्ङ एस फिल्मच्या निर्मात्यांच्या वतीने सांगण्यात आले.

Post a Comment

 
Top