Add

Add

0
      “बीट एअर पोल्यूशन्स” ने साजरा करू जागतिक पर्यावरण दिवस
               एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये “एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन” चे उद्घाटन 5 जून रोजी


पुणे (प्रतिनिधी ):- एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा स्थापना दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच, जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने या वर्षी युनायटेड नेशन्सने संपूर्ण जगामध्ये “बीट एअर पोल्यूशन्स” ही थीम दिलेली आहे. त्याच धर्तीवर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने स्थापित केलेल्या “एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन” चे उद्घाटन बुधवार,दि.5 जून 2019 रोजी सकाळी 10.30वा. एमआयटी डब्ल्यूपीयू कॅम्पस, कोथरूड, पुणे येथे  करण्यात येणार आहे. 
या कार्यक्रमाला पुणे येथील आयआयटीमएम सफर चे संचालक व वैज्ञानिक  डॉ.गुफ्रान बेग,दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. संजय झोडपे, टेरी पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे आणि चेस्ट रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी, चंडिगढ येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक व प्रमुख, डॉ.राजेश कुमार व पुण्याच्या बी.जे.मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एम.पी.तांबे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड हे उपस्थित राहणार आहे.
वायु गुणवत्ता सुधारण्यासाठी युनायटेड नेशन्सने संपूर्ण जगातील सरकार, उद्योग, समुदाय आणि व्यक्तींना विनंती केली आहे की नवीकरणीय उर्जा आणि हिरव्या तंत्रज्ञानाचा शोध घेण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे. पर्यावरण संरक्षणासाठी जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने बीट एअर पोल्यूशन्स थीमला संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात चालविल्या जाणारे आहे. यालाच अनुसरूण एमआयटी डब्ल्यूपीयूच्या कोथरूड कॅम्पसमध्ये स्थापित केलेल्या “एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन” मध्ये हवेची गुणवत्ता (2.5पीएम व 10पीएम) मोजू शकतो. तसेच, येथील विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या एक मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे सर्वांना हवेच्या गुणवत्तेची माहिती कळेल. हा ऍप सर्व्हर डेटाला ट्रान्समिट केल्यामुळे ही माहिती येथील सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांना पोहचविली जाईल.
तसेच, यावेळी वाहन प्रदुषण नियंत्रण करण्यात यावे या करीता प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी विकसीत केलेल्या “विश्‍वास सायलेन्सर” चे प्रात्यक्षिक सुध्दा दाखविण्यात येणार आहेत. 
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा 5 जून 2017 हा  स्थापना दिवस आहे. याच दिवशी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्मार्ट कॅम्पस क्लाऊड नेटवर्कचे उद्घाटन केले होते आणि या कॅम्पसला स्मार्ट कॅम्पस बनविन्याचे धोरण निश्‍चित करण्यात आले होते. युनायटेड नेशन्स सस्टनेबल डेव्हलपमेंट गोल्स अंतर्गत हा प्रकल्प राबविला जात आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि सभोवतालच्या परिसरात वायु संरक्षण, वायु प्रदुषण, कचरा व्यवस्थापन, गतिशीलता, आवाज प्रदुषण यासारखे प्रकल्प राबविले जात आहेत. 
तसेच, स्मार्ट कॅम्पस क्लाऊड नेटवर्कच्या अंतर्गत स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर क्लासरूममध्ये केला जात आहे. तसेच, कॅम्पसच्या आत बाहेर एसडीजीच्या अंमलबजावणी केली जात आहे. याच कॅम्पस मध्ये २०१८ मध्ये जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने हीटव्हेव, वायु प्रदुषण आणि वेक्टर रोग क्लायमेट चेंज आणि हेल्थ सेंटरचीही स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढचा भाग म्हणून “एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन”ची स्थापना करण्यात येत आहे.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड, टेरी पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष व जागतिक पर्यावरण तज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे,आयसीसीआयडीडीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पांडव,एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. एस.परशूरामन, कुलसचिव प्रा.डी.पी.आपटे, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या पीस स्टडी विभागाचे प्रमुख प्रा.मिलिंद पात्रे आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या इंजिनियरिंग विभागाचे सहयोग अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Post a Comment

 
Top