Add

Add

0
    छंदोमयी ग्रुपचा छन्दोत्सव : 8व 9 जूनला नाशिक येथे
       महाराष्ट्रातील 20 विविध छन्दिष्ट्यांचे प्रदर्शन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निकेत पावसकर यांच्या संग्रहाचा समावेश
कणकवली(प्रतिनिधी ):-नाशिक येथील छंदोमयी ग्रुपकडून छत एक, छंद अनेक अंतर्गत 8 व 9 जूनला महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या वीस छन्दिष्ट्यांच्या विविध छंदांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील निकेत पावसकर यांच्याकडील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेशांच्या पत्रांचे प्रदर्शन होणार आहे.नाशिक येथील विश्वास गार्डन येथे होणार्या या प्रदर्शनात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. 
सध्याच्या डिजिटल युगात मुलांना अनेक गेम्स मध्ये नकारात्मक भावाविचार निर्माण करणाऱ्या गेमपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक, सृजनशील, संशोधनात्मक विचार रुजवून तसेच पुस्तके, लेखक, क्रीडा, संगीत अशा विविध कला आणि छंदांची आवड व त्यांची माहिती होण्या साठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे छंदोमयीच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे. 
नाशिकमधील प्रसाद देशपांडे या छन्दिष्ट्याने छंदोमयी या ग्रुपची निर्मिती केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध प्रकारचे छंद जोपासणारे छन्दिष्ट्य असून काहींचे वर्ल्ड रेकोर्ड झालेले आहेत. यामध्ये शिवकालीन नाणी, 18व्या शतकातील टाईपरायटर, कापुसशिल्प, देश परदेशातील क्रीकेटपटूंच्या क्रिकेट साहित्यावर स्वाक्षर्या, जुन्या गाड्यांच्या पार्टसपासून विविध शिल्प, शिवकालीन दुर्मिळ वस्तू व शस्त्रे, विविध रेल्वे, बस, टपाल तिकिटे, खडू, सुपारीपासून कोरीव सूक्ष्म श्रीगणेशा असे विविध छंद असणाऱ्या व्यक्ती आपल्या छंदाची माहिती देवाण-घेवाण या ग्रुपच्या माध्यमातून करत असतात. या सर्व छंदोमयीना एकत्र आणून छत एक छंद अनेक या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 
मुलांना काहीतरी चांगले पाहता यावे, चांगले अनुभवता आले पाहिजे आणि उत्तम ते अनुकरण करता आले पाहिजे, यासाठी हे प्रदर्शन महत्वाचे ठरणार आहे. यातील प्रत्येकजण महाराष्ट्रातील वेग वेगळ्या ठिकाणाहून वेग वेगळ्या प्रकारचे छंद जोपासत असून त्यांचे या प्रवासातील अनुभव ऐकायला मिळणार आहेत. शालेय मुलांना हे प्रदर्शन प्रोत्साहन देणारे ठरणार असून नाशिक येथील विश्वास गार्डन येथे सकाळी 9 ते रात्रौ 9 पर्यंत होणार आहे. 
निकेत पावसकर यांच्याकडील देश परदेशातील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेशांच्या पत्रांचे यावेळी प्रदर्शन होणार असून गेल्या 12वर्षांपासून ते हा संग्रह करीत आहेत.यातील अनेक संदेश तरुण पीढील प्रोत्साहन देणारे असून यामधून सकारात्मक विचार मिळतात. हा सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा पाहायला, अनुभवायला येण्याचे आवाहन या ग्रुपकडून करण्यात आले आहे. 
तळेरे येथे अक्षरघर (चौकट)
      निकेत पावसकर यांनी तळेरे येथे अक्षरांचे घर तयार केले असून त्यामध्ये देश आणि परदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध व्यक्तींनी पाठविलेली संदेश पत्रे पाहायला मिळतात. यातील अनेक पत्रे अनेकांना प्रोत्साहन देतात. शिवाय वैचारिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृध्दही करत आहेत. या अक्षरघराला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी भेटी दिल्या आहेत.    
 निकेत पावसकर, मोबाईल नं. 9860927199 / 9403120156

Post a Comment

 
Top