Add

Add

0

      माझ्या जीवनाचा मीच शिल्‍पकार-सुभाषराव देशमुख यांचे मत 

       एमआयटीतर्फे पंचकन्‍यांना पूर्णब्रह्मायोगिनी त्‍यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्‍का कराड समर्पित                                                                             जीवनगौरव पुरस्‍कार प्रदान 

लातूर (प्रतिनिधी ):- ‘‘माझ्या जीवनाचा मीच शिल्‍पकार आहे, हवे ते मी घडवू शकतो आणि  मी सर्वांना घेऊन चालणार, हे सूत्र लक्षात ठेवून कार्य केल्यास हा समाज प्रगतीपथावर जाईल. याचे उत्तम उदाहरण म्‍हणजे रामेश्वर रूई या गावाची माती. येथूनच सर्वधर्म समभावाची कल्‍पना येते. असे मत नाशिक येथील नवसंजीवनी वर्‍ल्ड पीस रिसर्च फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्‍त सुभाषराव देशमुख यांनी मांडले.
विश्वशांती केंद्र आळंदी,माईर्स एमआयटी,पुणेतर्फे  पूर्णब्रह्मयोगिनी त्‍यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्‍का कराड यांच्‍या सहाव्‍या पुण्यस्‍मरण स्‍मृतिदिनाचे औचित्‍य साधून,शैक्षणिक,सामाजिक आणि अध्यात्‍माचा समन्‍व यातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्‍याहतपणे करून, समाजासमोर  आदर्श निर्माण करणाऱ्या पंचकन्‍या मधील नंदूरबार येथील ज्‍येष्ठ समाजसेविका व आदिवासी मुला मुलींसाठी कार्य करणाऱ्या श्रीमती निर्मला देवकी नवल सोनीस, बीड येथील ज्‍येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. सौ. प्रज्ञा भरतबुवा रामदासी , पुणे येथील आरोग्‍य सेवा देणाऱ्या डॉ. शशिकला अनंत सांगळे, पुणे येथील ज्‍येष्ठ समाजसेविका व एमआयटी ज्‍युनिअर कॉलेजच्‍या प्राचार्या डॉ. रोहिणी वासुदेव पटवर्धन आणि पुणे येथील आदिवासी गरीब कुटुंबाची पालन पोषणाची सेवा करणाऱ्या ज्‍येष्ठ समाजसेविका सौ. मधुरा मुकुंद भेलके या पंचकन्‍यांना पूर्णब्रह्मायोगिनी त्‍यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्‍का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्‍काराने सन्‍मानीत करण्यात आले. त्‍याच प्रमाणे पुणे येथील आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा चालविणाऱ्या व ज्‍येष्ठ समाजसेविका सौ. सुशिला रतनलाल सोनाग्रा यांना विशेष जीवन गौरव पुरस्‍काराने सन्‍मानीत करण्यात आले. सन्‍मानपत्र, स्‍मृतिचिन्‍ह, सुवर्णपदक व रोख ११ हजार रूपये असे पुरस्‍काराचे स्‍वरूप होते.
यावेळी लातूरचे माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील हे सन्‍मानीय प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्‍हणून उपस्‍थित होते. तसेच ज्‍येष्ठ शास्‍त्रज्ञ व कृषीतज्ञ डॉ. शिवाजीराव शिंदे हे सन्‍माननीय पाहुणे म्‍हणून उपस्‍थित होते.
यावेळी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्‍थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उर्मिला विश्वनाथ कराड,  शेतीनिष्ठ कर्मयोगी, ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी काशीराम दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड,एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्या लयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, थोर साहित्यिक व लेखक प्रा.रतनलाल सोनग्रा, कमल राजेखाँ पटेल, डॉ. हनुमंत कराड, दिलीपराव पटवर्धन, ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर  व राजेश कराड हे उपस्‍थित होते.
सुभाषराव देशमुख  म्‍हणाले, ‘‘संस्‍कारांनी जी मंडळी सामाजिक कार्य करतात ते एक आदर्श व्‍यक्‍तीमत्‍व असते. वेडी माणसे इतिहास घडविता. शहाणी माणसे बँक बॅलेन्‍स वाढवितात पण त्‍यांची मुले ती संपवितांना दिसतात. सामाजिक कार्य करताना कधीही गरीबी सांगू नका.  जूनी माणसे तरूण पिढीवर चांगले संस्‍कार घडविण्याचे कार्य करतात. त्‍यामुळे नवी पिढीने त्‍यांच्‍या आदर्शावर चालावे.’’
गोपाळ पाटील म्‍हणाले, भारत देश प्रगतीपथावर आहे. देशाची लोकसंख्या 130 कोटी असली तरी त्‍यात युवकांची संख्या अधिक आहे. त्‍यामुळे हा देश युवकांचा आहे. अशावेळेस या युवकांना ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान आणि आत्‍मज्ञानाचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. स्‍वामी विवेकानंद यांनी या जगामध्य एकात्‍मता व सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे. आपला देश तंत्रज्ञानत पुढे गेलेला आहे. जगातील 10 मोठ्या कंपन्‍यातील 7 कंपन्‍यांचे नेतृत्‍व भारतीय लोक करीत आहेत. त्‍यात महिलांचे योगदान सर्वाधिक आहेत. तरूणांना ज्ञानकडे वळविले पाहिजे. त्‍यासाठी जगाच्‍या कोणत्‍याही कोपऱ्यात जावे. देशांत युवकांची संख्या वाढत आहे. त्‍याची समस्‍या मोठी आहे. त्‍यांचे शिक्षण ,ज्ञान, तंत्रज्ञान व कौशल्‍य वाढविले तर जगात यांची मागणी वाढेल. मानसीक प्रश्न सोडिविण्यासाठी वेगळा प्रयोग करावा लागेल. भारतीय विचार सरणी याचा प्रसार करणे गरजेचे आहे.  ’’
डॉ.शिवाजीराव शिंदे  म्‍हणाले,‘‘स्‍वातंत्र्यानंतर या देशात काही गोष्टी गंभीर घडल्‍या आहेत. मोबाइल ने प्रत्‍येकाच्‍या जीवनातील एकाकीपणा घालविला. प्रत्‍येक क्षेत्रातील व्‍यक्‍ती हा त्रस्‍त दिसतो. व्‍यक्‍तीला त्‍याच्‍या क्षेत्रात काम करण्याचा आनंद मिळत नाही तर मग सुखी कोण आहे. ही समस्‍या वाढत जात आहे. वर्तमान काळात समाजातील आपसातील भावना संपुष्टात येतांना दिसत आहेत. परंतू जो अशिक्षीत व्‍यक्‍ती आहेत त्‍यांनी माणुसकी सांभाळून ठेवली आहे. आम्‍ही प्रचंड प्रगती केली पण, मानवतेच्‍या स्‍तरावरील सर्व गोष्टी विसरलो आहेत. त्‍यामुळेच अनेक प्रकारच्‍या गंभीर स्‍थिती निर्माण झाल्‍या आहेत. आता कौटुबिक अवस्‍था ही रसातळाला पोहचली आहे त्‍यामुळे आमच्‍यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे.’’
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्‍हणाले, ‘‘अक्‍कांची आठवण ही हदय स्‍पर्शी आहे. त्‍यांनी वारकरी सांप्रदायाच्‍या माध्यमातून संपूर्ण जगात नाव पोहचविले. धाडसी निर्णय व  त्‍याग मूर्ति, प्रयाग अक्‍कांनी सहा तपापर्यंत पांडुरंगाचे नामस्‍मरण केले. त्‍या शक्‍तीच्‍या स्‍त्रोत आहेत.भारतीय संस्‍कृती, परंपरा आणि तत्‍वज्ञानाचे मुर्तीमंत प्रतिक त्‍यागमूर्ती प्रयागअक्‍का आहे. ’’ 
निर्मला नवल सोनीस म्‍हणाल्‍या,‘‘सामाजिक कार्यासाठी परिवार व गावातील लोकांनी सहकार्य केले.  ’’ 
हभप रामदासी म्‍हणाल्‍या,‘‘बालपणीच कीर्तनाचे बालकडू आईवडिलांनी पाजले.भारत भ्रमण केले. समाज प्रबोधन करण्यासाठी कीर्तनाचे माध्यम निवडले.जीवनाच्‍या गाठीशी चांगले व वाईट अनुभव आले. अक्‍कांच्‍या विचारांमुळे कराड परिवारांनी हिमालयापेक्षा मोठे कार्य केले आहे.’’
डॉ. शशीकला सांगळे,‘‘हा पुरस्‍कार स्‍वीकारणे हे माझे भाग्‍य आहे. निस्‍वार्थी व परोपरकारी संस्‍कार परिवारांकडून मिळाले.  गरीब रुग्‍णांची सेवा करण्याचे भाग्‍य मला मिळाले आहे. ’’
डॉ. रोहिणी वासुदेव पटवर्धन म्‍हणाल्‍या ‘‘सर्वांना आपलसे करने ही कला अक्‍कांकडे होती. मनाच्‍या उर्मीने त्‍याग करून मी समाजकार्यची सुरूवात केली. पुढील काळात आयुष्य वाढणार आहे. त्‍यामुळे वेगळी परिस्‍थिती निर्माण होईल.  मानसीक, सामाजिक व आर्थीक कार्य केले पाहिजे. सर्वांनाच त्‍यागाच्‍या आठवणीची किनार मिळत नाही. अक्‍कांच्‍या कार्यातून लोकांना प्रेरणा मिळावी म्‍हणून  पुरस्‍कार देण्याचे काम डॉ. विश्वनाथ कराड करीत आहे.  ’’
सौ. मधुरा भेलके‘‘जनसेवा हीच ईश्वर सेवा हे सूत्र लक्षात ठेऊन समाजकार्य सुरू केले. देवाला आलेला पैसा हा समाजाचा असतो.  ’’
नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांनी प्रास्‍ताविक केले. विजय काळे आणि प्रा. गोविंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.

     

Post a Comment

 
Top