Add

Add

0

'तुझ्यात जीव रंगला'तील अभिनेत्यावर फसवणुकीचा गुन्हा

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील राणादादाचे वडील मंत्री प्रतापराव गायकवाड अर्थात अभिनेते मिलिंद दस्ताने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएनजी ज्वेलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी दस्ताने दाम्प्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   पुणे (प्रतिनिधी ):-झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील राणादादाचे वडील मंत्री प्रतापराव गायकवाड अर्थात अभिनेते मिलिंद दस्ताने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीएनजी ज्वेलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी दस्ताने दाम्प्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अक्षय गाडगीळ यांनी या प्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मिलिंद दस्ताने आणि त्यांची पत्नी सायली दस्ताने यांनी पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या औंध येथील दुकानातून 25 लाख रुपयांच्या दागि न्यांची खरेदी केली होती. मात्र, या खरेदी केलेल्या दागिन्यांचे त्यांनी वर्षभरानंतरही पैसे दिले नाहीत. आपली एक मालमत्ता विक्री करायची असून त्यातून 3 कोटी रुपये मिळणार आहेत.त्यामुळे ही रक्कम दागिन्यात गुंतवायची असल्याचे मिलिंद दस्ताने आणि त्यांच्या पत्नीने सांगितले. त्यांनी 25.69लाख किंमतीचे एक किलो सोन्याचे दागिने खरेदी केले.मात्र, रक्कम एकत्रित देण्याऐवजी हप्त्यांवर देणार असल्याचे सांगितले असल्याची माहिती गाडगीळ यांनी दिली. औंध येथील स्टोअर मॅनेजर निलेश दस्ताने हा मिलिंद दस्ताने यांचा पुतण्या आहे. मिलिंद यांना मोठ्या प्रमाणावर दागिने खरेदी करायचे असल्याची माहिती निलेशने दिली. मिलिंद दस्ताने हे वेळेवर पैसे देतील याची हमी निलेशने दिली असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.
दस्ताने दाम्प्त्याने 4 मार्च 2018रोजी औंध येथील दुकानातून 4.92 लाखांचे दागिने खरेदी केले. या खरेदीसाठी त्यांनी 2.44लाखांचे दोन धनादेश दिले. त्यातील एकच धनादेश वटला. मिलिंद दस्ताने अभिनेते व नात्या तील असल्यामुळे निलेशने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजीदेखील दस्ताने यांनी दागिने खरेदी केले. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या बॅंकांच्या धनादेशाद्वारे दागिन्यांचे बिल दिले. मात्र, ते धनादेशही वटले नाहीत.दागिन्यांच्या थकित बिलासाठी मिलिंद दस्ताने यांच्याकडे ज्वेलर्सने अनेकदा विचारणा केली. मात्र, त्यांनी पैसे ही दिले नाहीत किंवा दागिनेही परत केले नसल्याची माहिती गाडगीळ यांनी दिली.
मिलिंद दस्ताने आणि त्यांची पत्नी सायली यांच्यावर भादंवि 406, 420 आणि 34 नुसार गुन्हा दाखल कर ण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी दिली. सध्या पोलीस अधिक चौकशी करत असून या प्रकरणी आरोपींना अटक होऊ शकते अशी माहिती जाधव यांनी दिली. 
 

Post a Comment

 
Top