Add

Add

0
बिग बॉस कॉन्टेस्टंट माधव देवचकेबद्दल आस्ताद काळेने 
लिहिली सोशल मीडियावर पोस्ट

पुणे (अनुजा कर्णिक ):-बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सरस्वती मालिकेतला राघव’ म्हणजेच मुख्य अभिनेता आस्ताद काळे दिसला तर आता बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात ह्या मालिकेतला राघवचा लहान भाऊ कान्हा म्हणजेच अभिनेता माधव देवचके दिसून येत आहे. 
मालिकेत जसे राघव-कान्हाचे एकमेकांवर निस्सीम प्रेम होते. तसेच आस्ताद काळेचे ही माधव देवचकेवर खूप प्रेम आहे. आणि हे प्रेम आस्तादने सोशल मीडियावरून नुकतेच दाखवले. आस्तादने त्याचा आणि माधवचा एक फोटो टाकून त्याखाली लिहीले आहे, ''हा असाच आहे...आयुष्यातल्या अनेक गोष्टींची कमालclarity आहे याला...जीवाला जीव लावतो...म्हणूनच जवळच्याचं काही चुकलं तर हक्कानी खूप ओरडतोसुद्धा....सगळ्यांचा लाडका कान्हा...आमचा लाडकामाध्या,मॅडी....भीड गड्या....'' 
आस्ताद काळेशी ह्याविषयी संपर्क साधल्यावर तो म्हणतो, मालिकेमुळे माझे माधवशी आयुष्यभरासाठी ऋणानुबंध जुळले. तो मला माझ्या सख्या भावासारखा आहे. माधव उत्तम क्रिकेटर असल्याने त्याच्यात स्पोर्टमॅन स्पिरीट आहे. त्यामूळे तो टास्कमध्येही चांगला खेळेल, असा मला विश्वास आहे.आस्ताद काळेप्रमाणेच मालिका आणि सिनेसृष्टीतले अनेक कलाकार सध्या माधवला सपोर्ट करत आहेत.

Post a Comment

 
Top