Add

Add

0
        देवसेवा प्रतिष्ठान उभारणार कलावंतांसाठी  कलाश्रम ...! 

मुंबई (महेश ):-"देवसेवा प्रतिष्ठान " संस्थेच्या वतीने बदलापूर येथे कलावंताला हक्काचे आंदण मिळावे या हेतूने दिग्दर्शक माननीय गौरव शिंदे यांनी बदलापूर येथील जागेची पाहणी करताना अजुन पर्यंत कलाश्रम हे कुठेच झाले नाही म्हणुन शोकांतिका व्यक्त केली असता जागे संदर्भातला प्रस्ताव देवसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक माननीय श्री  देविदास सोनावणे यांच्याकडे मांडला व त्यांनी तो मान्य करून जनतेसाठी कलाश्रम होणे हीं काळाची गरज आहे आणि ते झालेच पाहिजे यावर शिक्कामोर्तब करून हे कलाश्रम मी माझ्या कलाकारांसाठी लवकरात लवकर उभारेन असेही त्यांनी विश्वसनीय रित्या सांगितले.
सदर संदर्भात देवसेवा संस्थेच्या व आश्रमच्या साईड विझिट साठी दिग्दर्शक श्री गौरव शिंदे आले व त्यांनी यांनी प्लॉट संदर्भात बुकिंगची व आपल्या अनाथाश्रम, महिलांसह, वृद्धाश्रम आणि कलाश्रम ची  सुनिश्चित जागेची पाहणी केली. एकूण 400 कलावंतांची सुनिश्चित जागा आणि त्यातून सिनेकलाकार, कलावंत साठी सुनिश्चित जागा उपलब्ध करण्यात येईल तसेच कलाश्रम मधील सिनेकलाकार, कलावंत, दिग्दर्शक, निर्माता, छायाचित्रकार, कला दिग्दर्शक , दिग्दर्शक, स्पॉट बॉय, प्रकाशयोजनाकार यांच्यासाठी हे कलाश्रम महाराष्ट्रातले असणारे एकमेव कलाश्रम असणार त्याप्रमाणे आश्रमची पाहणी व आखणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितली त्याचप्रमाणे अभिनेते श्री कमलेश सावंत यांनीही हे कलाश्रम होण्यासाठी महत्वाचे योगदान दिले .या प्रसंगी देवसेवा संस्थेचे संस्थापक माननीय श्री देविदास सोनावणे तसेच संस्थेचे मानद सचिव आदी मान्यवर उपस्थित होते..! 

Post a Comment

 
Top