Add

Add

0

मिनिस्ट्री ऑफ बार्बेक़्यु हे वैशिष्ट्यपूर्ण ग्लोबल बार्बेक़्यु 
बफेट रेस्टॉरंट आता पुण्यात सुरु...

·    भारतातील पहिले लॉन्गेस्ट लावा स्टोन बार्बेक्यू टेबल
·  अमर्यादित स्टार्टर, शेकडो भारतीय, आशियाई आणि जागतिक फ्युजन डिशेश
·    शेफच्या विशेष विभागासह स्वयंपाकघरातील वातावरणाचा लाइव्ह अनुभव

पुणे (प्रतिनिधी ):-"प्रसिद्ध हॉस्पिटॅलिटी ब्रँड असलेल्या बिलियन स्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रा.ली.ने नुकतेच मिनिस्ट्री ऑफ बार्बेक़्यु हे वैशिष्ट्यपूर्ण ग्लोबल बार्बेक़्यु बफेट रेस्टॉरंट पुण्यात सुरु केले आहे. स्वयं पाकघरातील वातावरणाचा लाइव्ह अनुभव आणि जोडीला ग्राहकांच्या टेबल वर अमर्यादित बार्बेक़्यु सर्व्हिंग्जची निवड या रेस्टॉरंट मध्ये करता येणार आहे. भारतातील पहिले लॉन्गेस्ट लावा स्टोन बार्बेक्यू टेबलसह या रेस्टॉरंट मध्ये विविध प्रकारच्या भारतीय, आशियाई आणि जागतिक फ्युजन डिशेश मिळणार आहेत. 
अमर्यादित ग्लोबल स्टार्टर्ससह शेकडो शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ, ताजीतवानी करणारी पेयं आणि टाळूच न शकणारी डेझर्टस म्हणजे एक आनंददायी या रेस्टॉरंट मध्ये आहे. ‘फिटनेस प्रेमीं’ साठी त्यांच्या मेन्यू मध्ये अस्सल आरोग्यदायी सलाडचा समावेश करण्याकडेही रेस्टॉरंटचा विशेष कल आहे. वैशिष्ट्यपूर्ण लाइव्ह बार्बेक़्यु काऊंटर आणि लाइव्ह शेफ स्पेशल विभाग यांच्यासह या रेस्टॉरंटमध्ये मोकळ्या हवेतील आणि इनडोअर सिटींग सह परिषद आणि पार्टी रूमची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 
बिलियन स्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रा.लीचे उपाध्यक्ष कुमार गौरव म्हणाले, “वाकड हे मुंबई पुणे महामार्गाजवळ असलेले आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे आणि इतर नामांकित व्यवसायांचे नवे केंद्र बनले आहे. वैशिष्ट्यपूर्ण ग्लोबल बार्बेक़्यु काऊंटर बफेट रेस्टॉरंटच्या साथीने आम्ही विशिष्ट वातावरण, अस्सल गुणवत्तेचे आणि चवीचे खाद्यपदार्थ घेऊन खाद्यसंस्कृती उंचावण्यासाठी आम्ही पुणे बाजारपेठेत प्रवेश करत आहोत, 
कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह शेफ मनू आर. नायर म्हणाले, “आधुनिक जगाशी नाळ जोडून ठेवताना आम्ही बार्बेक्यू आणि तंदूरच्या पलीकडे जाऊन अमर्यादित बफेट सर्व्हिंग्जच्या अनुभवाची पुनर्व्याख्या केली आहे. आम्ही आशियाई आणि  भारतीय खाद्यपदार्थ जगभरातील समकालीन खाद्यपदार्थांच्या आधुनिक रुपात घेऊन येत आहोत. प्रत्येकाच्या इच्छेचा मान राखत विविध प्रकारच्या फ्युजन डिशेश सह आमच्याकडे पारंपरिक पर्यायही उपलब्ध आहेत.” 
या सगळ्या पदार्थांची किंमत वाजवी आहे. साधारण सरासरी प्रत्येक व्यक्तीसाठी 599 रुपये आणि त्यापेक्षा थोडे अधिक लागतील. खरोखरच वाजवी किमतीत उत्तम गुणवत्तेचे पदार्थ येथे उपलब्ध आहेत. 
+91-7798602000 / 7888049898 या क्रमांकावर संपर्क करून तुम्ही तुमच्यासाठी टेबल राखून ठेऊ शकता.मग, आता वाट कशाची बघत आहात? राजासारखा शाही मेजवानीचा आस्वाद घ्या
 पत्ता :- दत्त मंदिर रस्ता, शंकर कला नगर, वाकड, पुणे
 मिनिस्ट्री ऑफ बार्बेक़्यु फ्रांचायझी विषयी:-फ्रांचायझी स्वरूपातून मिनिस्ट्री ऑफ बार्बेक़्युच्या उत्साहवर्धक विस्तार योजना आहेत. त्यातून ब्रँड लवकरच पुण्याच्या कॉस्मोपॉलिटिन क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणार आहे. पुण्याच्या पलीकडे जाऊन आगामी काही महिन्यात ब्रँड मुंबई आणि नवी मुंबई येथेही आणखी काही आउटलेट सुरु करण्याच्या विचारात आहे. मिनिस्ट्री ऑफ बार्बेक़्युच्या वैशिष्ट्यपूर्ण फ्रांचायझी मॉडेलमुळे कंपनी आणि फ्रांचायझीला भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी संधी आहे. 
For more information, please contact: 
          Gaurav Singh - 9970357280Post a Comment

 
Top