Add

Add

0
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयास प्रारंभ
आषाढी वारीत सहभागी वारकरी बांधवांना
सर्वतोपरी सोईसुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबध्द
-         पालकमंत्री चंद्रकांत (दादापाटील

   
 पुणे (प्रतिनिधी ):-पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी राज्यभरातून पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेतया वारीत सहभागी वारकरी बांधवांना आवश्यक त्या साईसुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन महसूलसार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.
            संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा शुभारंभ महसूलसार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या उपस्थितीत आज श्री क्षेत्र आळंदी येथे झालायावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्तॲडविकास ढगे पाटीलविश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई,  विश्वस्त डॉ.अजित कुलकर्णी,  अभय टिळक आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री पाटील म्हणालेआषाढी वारी मार्गावर राष्ट्रीय सेवा योजनेचे 35हजारावर विद्यार्थी वृक्षारोपन करणार आहेतवारकरी बांधवांना जेवणासाठी 50 लाखावर पत्रावळयांचे नियोजन करण्यात आले आहेयासोबतच वारी मार्गावर एक हजार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेया शिबिराच्या माध्यमातून आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेतरेनकोटस्वच्छतागृहासोबतच आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
        आध्यात्मिक ठिकाणाच्या माध्यमातून आध्यात्मिक समाधान मिळतेही समाधानाची बाब असल्याचे सांगून या आध्यात्मिक ठिकाणाच्या माध्यमातून मदतीचेही कार्य विस्तारले जावेशेगाव संस्थानच्या धर्तीवर काम उभे राहावेअशी अपेक्षा पालकमंत्री श्रीपाटील यांनी व्यक्त केली.
संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री श्रीपाटील यांच्याकडे यावेळी देण्यात आला.
     पालखी प्रस्थानानंतरश्री क्षेत्र आळंदी येथील गांधी वाडयात पालखीचा मुक्काम राहणार असून त्यानंतर पुढील प्रवासासाठी पालखी मार्गस्थ होणार असल्याची माहिती यावेळी विश्वस्तांनी दिली.  या सोहळयास वारकरीनागरीकस्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी,स्वयंसेवक उपस्थित होते.                                                           

Post a Comment

 
Top