Add

Add

0

शिक्षणाच्या माध्यामतून वंचितांच्या सामाजिक विषमतेची दरी भरून काढण्याची  शक्ती  ‘ व्हर्च्युअल एज्युकेशन’ मध्ये – नामदार आशिष शेलार

  पिंपरी (प्रतिनिधी ):-राज्यसभा खासदार मा. अमर साबळे यांच्या संकल्पनेतून सुरु होत असलेल्या ‘पढेगा भारत’ या अभियानाचे उदघाटन जेष्ठ शास्त्रज्ञ पद्म विभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर व नामदार आशिष शेलार , श्री अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते  झाले. कार्यक्रम प्रसंगी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख, आमदार सौ मेधाताई कुलकर्णी, नगरसेवक श्रीधर भाटे, श्री योगेश गोगावले, श्री शहाजी पवार, सदाशिव खाडे, माऊली थोरात आदी  मान्यवर उपस्थित होते. 
शिक्षण मंत्री झाल्या नंतर विद्येच्या माहेर घरात व दिग्जाच्या उपस्थितीत पहिला कार्यक्रम होत असल्याचा आनंद ना. शेलार यांनी व्यक्त केला. सदर प्रसंगी बोलताना नामदार शेलार यांनी अधुन्निक तंत्रज्ञानाचा वापर हा वंचित व पिडीताना मुख्य प्रवाहाशी जोडणारा सेतू म्हणून केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील शेवटच्या व्यक्ती  पर्यंत विकासाची फळे पोहोचविण्याचे काम पढेगा भारत सारखे उपक्रम करत आहेत. या बद्दल समाधान व्यक्त केले. लेखकाने लिहिलेला धडा त्याच लेखकाने एकाच वेळी लाखो विध्यार्थ्यांना शिकवणे व्हर्च्युअल एज्युकेशन मुळे शक्य असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्थाविक करताना  खासदार अमर साबळे यांनी “पढेगा भारत”च्या परंपरेमध्ये शिक्षण व चारित्र्य हाच विकासाचा धागा आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञांचा  वापर करून  ‘ सबका साथ सबका विकास  सबका विश्वास ’ या उक्तीला साजेशे काम केले जाऊ शकते असा विश्वास व्यक्त केला. “पढेगा भारत” व “चाणक्य मंडल” यांचा सामंजस्य करार झाल्यामुळे  1 जुलै पासुन 8 वी ते 12 चे तज्ञ शिक्षकाचे वर्ग तसेच लोकसेवा आयोगाच्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे चे वर्ग,  विविध भाषांचे मार्गदर्शन आदि उपक्रम संपूर्ण राज्यभर सुरु केले जात असल्याची माहिती दिली.
 या प्रसंगी बोलताना डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शिक्षनाचा हक्क योग्य शिक्षण व योग्य पद्धतीने दिले जाणारे शिक्षण या त्री  सुत्रीमुळे शालेय शिक्षणापासूनच वैज्ञानिक मुल्य असणारे शिक्षण सर्वत्र पोहोचवले जाऊ शकते. माहिती तंत्रज्ञांच्या वापरामुळे कठीण विषय सोपे करून  शालेय शिक्षणात समाविष्ट केले जाऊ शकतात, असा विशवास व्यक्त केला.
माननीय अविनाश धर्माधिकारी  यांनी बोलताना शास्त्रज्ञ व देशभक्त व    कार्यक्षम अधिकारी हेच देशाचे नेतृत्व करू शकतात, असे सांगितले.पुस्तकामुळे मनाची मशागत होते तर एक रोपटे हे निसर्गाने लिहिलेले एक महान  पुस्तकच असते, त्या मुळे पुस्तक व रोपटे भविष्यासाठी जपले पाहिजेत असे सांगितले. भविष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध असणारा डाटा  हा त्यादेशाच्या प्रगतीचा निर्देशक असेल असे ते म्हणाले.

Post a Comment

 
Top