Add

Add

0
              
                  गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलमध्ये योग दिन साजरा 

पुणे (प्रतिनिधी ) :- सध्याच्या धावपळीच्या जीवनात बाकी सगळं मिळतं पण आपण स्वतःच्या शरीराकडे अर्थात आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहोत. रोज योगा केल्याने ताणतणावपासून दूर राहतो. इतकंच नाही तर माणसाचे वजनआणि सांधेदेखीलयामुळे दणकट राहतात. शरीराच्या स्नायूंना बळकटी येतेतुमच्या शरीराची ठेवण सुधारेल. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शिवाय तुम्ही नियमित योगामुळे आजारापासून दूर राहू शकता असा सल्ला योग आणि ध्यानधारणा या क्षेत्रात अनेक वर्ष काम केलेले मनशक्ती फौंडेशनचे सदस्य मनीष शिंदे यांनी दिला.
गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलचे  2000 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी झाले.2 पर्यंतच्या मुलांनी सूर्यनमस्कार केले.6 ते 8 वीचे विद्यार्थी मनीष शिंदे यांच्या सत्रात उपस्थित होते. योग दिनाच्या निमित्ताने 9 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी लोणावळा येथील कैवल्य धाम येथे भेट दिली.तेथे योगींसोबत केलेल्या ध्यानधारणेतून अभ्यासामुळे आलेला तणाव दूर होऊन सकारात्मक उर्जा मिळते यांचा अनुभव त्यांनी घेतला. 
गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल मुख्याध्यापिका भारती भागवाणीगोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता यावेळी उपस्थित होते. गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी आसने केली तर लहान मुलांनी सूर्यनमस्कार घातले.रोज आपल्या मनात आणि शरीरात राहणाऱ्या ताण तणावांचा निचरा करायचा करण्यासाठी योगाचा नित्यनियमाने सराव करणे आवशयक आहे. योगासने,प्राणायाम आणि ध्यानधारणा या सर्व प्रभावी तंत्रांचा उपयोग करणे भविष्यातील निरोगी शरीरासाठी प्रभावी ठरते. असे मत सोनू गुप्त यांनी व्यक्त केले.
 ---------------------------------------------------------------------

Post a Comment

 
Top