Add

Add

0
              सुदीप आणि सुनील शेट्टी यांचा "पहलवान" चित्रपट
                   12 सप्टेंबर  2019 रोजी प्रदर्शित होणार 

पुणे(संतोष शर्मा ):-सुपरस्टार सुदीप आणि सुनील शेट्टी यांची अभिनित,झी स्टुडिओजचा आगामी एक्श न ड्रामा चित्रपट पहलवान , लवकरच प्रदर्शित होणार आहे, यापूर्वी चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला होता त्यास प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला  आहे।  अत्ता  हा चित्रपट 12  सप्टेंबर 2019 रोजी , भारतात 2500 स्क्रीनवर  चित्रपट प्रदर्शित होणार आहे, जो कोणत्याही कन्नड चित्रपटासाठी सर्वात मोठा रिलीझ असेल.
कृष्णा यांनी दिग्दर्शित स्वपन्ना कृष्णाद्वारे निर्मित आणि झी स्टुडिओजद्वारे प्रस्तुत,हा ऍक्शन ड्रामा चित्रपट हिंदी, कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल. चित्रपटा मध्ये ड्रामा ,एक्शन आणि विनोदांच्या मोठ्या प्रमाणावर तड़का लावण्यात आला असून,पहलवान चित्रपटाची सार्वत्रिक कथा आहेजो गर्व,प्रेम आणि त्याच्या खेळासाठी लढतो; हा पहलवान संपूर्णपणे पारिवारिक मनोरंजन चित्रपट आहे.
चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक कृष्णा म्हणाले, "या चित्रपटातील कथा एक सार्वत्रिक थीम आहे, जी लोकांच्या हृदयांना स्पर्श करेल. आम्ही या चित्रपटाच्या प्रदर्शना बद्दल समाधानी असून खूप आनंदी आहोत, विशेषतः हा चित्रपट 5 भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. "

Post a Comment

 
Top