Add

Add

0
       महाराष्ट्र कृषीदिनी लोटे-परशुराम गोशाळा येथे वृक्षारोपण...  

   निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा उपक्रम 

चिपळूण (प्रतिनिधी):- नजीकच्या लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीच्या ग्रीन झोनमध्ये 11वर्षांपूर्वी उभार ण्यात आलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळा येथे सकाळी महाराष्ट्र कृषिदिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी उंबर,चाफा,बहावा,पिंपळ जातीच्या 15 वृक्षांचे रोपण करण्यात आले. 
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव धीरज वाटेकर यांनी ही रोपे उपलब्ध करून दिली.
श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज यांच्या उपस्थितीत या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी बोलताना श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळा या सर्व झाडांचे संगोपन करेल असे आश्वासन त्यांनी दिले. अवघ्या ४ गायींवर सुरु झालेल्या या गोशाळेत 550० गाईंचे पालन-पोषण केले जाते. शेतकऱ्यांना सांभाळणे कठीण झालेल्या, अपघातात जखमी झालेल्या विविध भाकड गायींचे संगोपन येथे केले जाते. त्याकरिता १५ कर्मचारी येथे दैनंदिन सेवेत आहेत. 
यावेळी महेंद्रगिरी निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष अनिकेत चोपडे, नंदन वाटेकर, इंचगिरी सांप्रदायचे बुवा चव्हाण उपस्थित होते.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने राज्यभर ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, बीज पुरवठादार, ‘वनश्री’ महेंद्र घागरे यांनी उपलब्ध करून दिलेल्या बियाणांच्या माध्यमातून दरवर्षी अभियान राबवले जाते.

Post a Comment

 
Top