Add

Add

0
                        शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा आणि
                  शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न ...! 
परेल -मुंबई ..(प्रतिनिधी ):-साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल (एज्यूको) आणि विद्यार्थी पालक संघ च्या विद्यमाने  गुरुपौर्णिमा या सणाचे औचित्य साधुन इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी मधील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भरघोस मार्काने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव सोहळा सोहळा दिनांक 16जुलै रोजी साईबाबा शाळेच्या व्यासपीठावर संपन्न झाला. याप्रसंगी शिवानी मॅडम , आरती टीचर , उषा टीचर , प्रगती टीचर ,सदाफ टीचर, मनीषा टीचर, योगेश साळवी सर,  पालक सौ प्रिया रेवडेकर , सौ.प्रिया घाडगे , सौ.शोभा घाडगे , सौ.सरिता पाटील, पालक सर्वश्री सचिन शिंदे , महेश्वर तेटांबे , नितीन रेवडेकर , हरिदास लोणे , जगदीश गुप्ता , स्वप्नील देसाई , संतोष चौगुले , आदी मान्यवर उपस्थित होते .याप्रसंगी  शिवानी मॅडम यांनी आपल्या मनोगतपर  भाषणांतकाही निवडक  यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमाचे महत्व पटवून दिले , तसेच सौ आरती टीचर यांनी पालकांचे आभार मानून विद्यार्थ्यांची मेहनत तर आहेच पण त्याबरोबर पालकांचे सहकार्य सुद्धा महत्वाचे असते आणि ते आम्हाला वेळोवेळी मिळत गेले म्हणुन आज हि मुले शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशस्वी झाली. सत्कार सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांची "गुरुपौर्णिमा" या विषयावर भाषणे झाली अशा तऱ्हेने गुरुपौर्णिमा हां पवित्र सण विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अतूट स्नेहबंधाने संपन्न झाला .

Post a Comment

 
Top