Add

Add

0

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन- सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांची माहितीमुंबई(प्रतिनिधी):-लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात विवि ध कार्यक्रम व लोकोपयोगी उपक्रम आयोजित केले जाणार असून यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी  दिली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी डॉ.खाडे बोलत होते.यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री अविनाश महातेकरसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेसमाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर,अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे,बार्टीचे महासंचालक कैलास कणसे व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ.खाडे म्हणालेलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची व साहित्याची ओळख समाजातील प्रत्येक घटकाला होण्यासाठी जन्मशताब्दीनिमित्त शाहिर परिषद,साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहेत.मातंग समाजातील मुलांना यूपीएससी,एमपीएससीसाठी अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या जागेवर अभ्यास केंद्र उभारणे,अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मगावी वाटेगावजि.सांगली येथे 1 ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करणे,अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करणे,100व्या जयंतीनिमित्त 100 व्यक्ती व संस्थांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देणे. मातंग समाज कलासक्त असल्याने मातंग समाजातील नवोदित व गरजू कलावंतांना वाद्य साहित्याचे वाटप करणेअशा विविध कार्यक्रमांचा समावेश असेल.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी त्यांचे टपाल तिकिट प्रकाशित करण्यात येणार आहे.  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे वाटप करणेचेंबूर मुंबई येथे जन्मशताब्दीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Post a Comment

 
Top