Add

Add

0

       ‘तुला पाहते रे’च्या निरोपानंतर सुबोध भावेची भावनिक पोस्ट..

मुंबई (प्रतिनिधी ):- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेली ‘तुला पाहते रे’ या मालिकेने अखेर शनिवारी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये विक्रांत सरंजामेची भूमिका साकारलेल्या सुबोध भावेला आणि ईशा निमकरची भूमिका साकारलेल्या गायत्री दातारला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. ही मालिका संपू नये अशी प्रेक्षकांची इच्छा होती.
मात्र मालिका संपल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला. मालिकेला निरोप दिल्यानंतर अभिनेता सुबोध भावेने ट्विटरच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक खास संदेश दिला. “आणि आज मालिका संपली. तुमच्या सर्वांचं भरभरून प्रेम आयुष्यभर आम्हाला ऊर्जा देत राहील. झी मराठी वाहिनी, आमचे निर्माते, दिग्दर्शक,तंत्रज्ञ आणि कलाकार या सर्वांमुळे ही मालिका झाली. तुमचे “तुला पाहते रे” संघाच्यावतीने मन:पूर्वक धन्यवाद.
विक्रांतकडून खूप प्रेम. भेटू या लवकरच. रामराम”, असं ट्विट करत सुबोधने प्रेक्षकांचे आभार मानले. या मालिकेत सुबोध भावेने विक्रांत सरंजामे याची भूमिका योग्यरीत्या पार पाडली . त्यासोबतच गायत्री दातारने साकारलेल्या ईशा निमकर आणि राजनंदिनी सरंजामे या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज करत होती .
आणि आज मालिका संपली.
तुमच्या सर्वांचं भरभरून प्रेम आयुष्यभर आम्हाला ऊर्जा देत राहील.
झी मराठी वाहिनी,आमचे निर्माते, दिग्दर्शक,तंत्रज्ञ आणि कलाकार या सर्वांमुळे ही मालिका झाली
तुमचे "तुला पाहते रे" संघाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद.
" विक्रांत " कडून खूप प्रेम.
भेटूया लवकरच.
रामराम

View image on Twitter

Post a Comment

 
Top