Add

Add

0

                 नवीन वर्ष कॅलिफोर्नियात.... 

दि.30-12-2014 ला कोलोराडोहून रविचा पुण्यातील सी.वो.ई.पी .कॉलेज जीवनातील मित्र पंकज मेश्राम –शीतल –अन दोन गोंडस मुलासह फ़िनिक्ष येथीलआमच्या घरी आली .आम्हा उभयतांचा अमेरिकेतला हा तिसरा प्रवास तोही तीनवेगवेगळ्या मार्गांनी ..पंकज आय .टी.क्षेत्रात तर शीतल डॉक्टर ..भारी उत्पन्न..साहजिकच बर्याच दिवसापासून कोलोराडो इथ राहत असल्यान स्वत:च हक्कचघर नव्हे मिनी राजवाडाच ओघान आलच..येताना ते फ़िनिक्ष इथल्या स्कायहार्बर एअरपोर्ट जवळची रेंटवरची कार घेऊन आले .जुन्या आठवणीत बरीच रात्र गेली .
 क्यालीफोर्नियाची व्हिजीट पूर्वनियोजित होती .संगनमताने ठरलेली..दि31-12-2014च्या सकाळी नऊच्या दरम्यान आम्ही घर सोडल.एक शिटचीअडचण,नेहमी सतावत असल्यान मला पंकजच्या कार मध्ये बसण्याशिवायपर्याय नव्हता.रविन स्वत:चीकार काढलीआणि भरदाव वेगात आनंदात निघालो .रस्त्यात म्हणावीशी गर्दी नव्हती.Salome रोड वरील एका रेस्टएरियात उतरलो.खाली उतरताच झोड पून काढणारा थंडवारा..हैराणझालो.थरथरत पुन्हा गाडीत बसलो.डावीकडच्या डोंगराचे शिखर पांढरेशुभ्र दिसत होते..दुतर्फा रस्ता जागोजागी लहानमोठ्या कापसाचे बोळे-ढिगारे ठेवावेत त्याप्रमाणे दिसत होता. त्याप्रमाणे डोंगराची उजवी बाजूकाळी दिसली .आकाशात काळे ढग सुसाट पळत होते .आकाश खाली आल.कार बाहेर मरणाची थंडी..आत उब..अनुभव गमतीदार होता.सकाळी 11.35च्या दरम्यान रस्त्यात Inspection Station.All vehicles Must Stopचा बोर्ड म्हणजे क्यालीफोर्नियाच प्रवेशद्वार ..वाहनांची सरकती रांग,पोलीस प्रत्येक गाड्या कसून तपासत होते .अमेरिकेतल्या जाचक अटी..कुणीही नियम मोडत नाहीत. नाहीतर बेड्या अन जेल आलीच. नोवशिला..नो अरेरावी –दादागिरी .. म्हणून तर पोलीस जवळ आला कीदरदरून घाम फुटतो बोबडी वळते..आमच्या दोन्ही कारचा फक्त फ़िनिक्ष शहराचा जो प्रसिध्द लोगो [ Cataract झाड.फक्त फ़िनिक्ष मध्येच आढळत.]पाहून पोलिसांनी जाण्याचा इशारा केला.धास्तीतून सुटलो.चोहोबाजूची सुखद हिरवळ..ताडामाडासारखी दिसणारी दाढीधारी झाड..भव्य शेती ..उभ पिक,जागोजागचे अहोरात्र झगमगणारे रंगी बेरंगी फलक पाहतचेवरन ग्यास स्टेशन म्हणजे पेट्रोल पंपावर उतरलो.
थंडीच्या लाटा सहन करत फूड मॉल मध्ये घुसलो.रविन कौंटरवरून चिकन सामोसे वगैरे पदार्थ आणले .तोब्बा गर्दी..कुणाची पर्वा न करता घरून आणलेलं जेवण बिनधास्त खाल्ल..तरतरी आली.तिथून निघायला1.30 वाजला.देखणी घर,सुरेख रस्ता,फुलानी बहरलेली झाडी,हिरवळ,वर्दळ ,सभोवताली पामची
एकाचा मापातली-नमुन्याची झाड,डोळे वटारूनपाहताना पापणी बंद होत नव्हती.एकदाचे Pam-Spring हे अति उंचावरच ठिकाण तिथ सर्वजन आलो.रवि-पंकजन Tram-Wayची तिकीट आणली .ट्रामवे त बसण्याची वेळ 3.30ची.वेळ बराच होता.लॉजवर जाऊ या म्हणाला.निघालो.अर्ध्या तासाच्या आत Holiday In Express Hotel &Suits[ Cathedral City] इथ आलो.दोन प्वाश रूम्स बुक झाल्या. जवळच मेश्राम परिवाराची रूम होती. मी सुनिता आणि लाडकी नात संघा 132मध्ये तर 134च्या रूमवर रवि-कल्पना अन श्रावक .सामान ठेवण्यात बराच वेळ गेला अन निघाण्यासहि .Pam-Spring Aerial Tram Way हे ठिकाण खूप उंचावर होत .उभा चढ चढताना बरीच दमछाक झाली
.वरती जायला जवळच फ्री बसेसची सेवा होती.आम्ही सर्वच नवखे.पहिल्यांदाच आलेलो माहित नव्हत .मरणाच्या थंडीतही मला घाम फुटत होता तशात भीतीही सतावत होती.इथल्या वातावणात एकरूप झालेली-वाढलेली निरागस मुल मात्र बिनधास्त.खोड्या करत चढ चडत होती.3.30ची वेळ निघून गेली . नाविलाजन 4.30 ची तिकीट बदलून घ्यावी लागली .हॉलमध्ये उब मिळताच बर वाटल.तोब्बा गर्दी ..हॉल खचाखच भरलेला ,एका बाकड्यावर बसताच उठावास वाटल नाही.उत्साही भली मोठी रांग हळू हळू पुढे सरकत होती .कोपऱ्यात Caution Wet and Icy may be slipperary त्याची पर्वा न करता एकदाचे मोठाल्या अशा काचेच्या बंदिस्त ट्राम मध्ये आलो.दाटी खूप खेटून उभ राहायला सुद्धा जागा नव्हती .पंधरा वर्षापूर्वी धम्म यात्रेत राजगिरा येथील नदीवरून सरळ जाणारा रोप वे चा थरारक अनुभव पाठीशी होता. इथ मात्र बा SS प रे ! खालून थेट तिरप्या रेषेत विशाल डोंगराच्या माथ्यापर्यंत अति उंच ठिकाणी जाण..वर जाणाऱ्या ट्राम सोबत आमच मरणही येत होत .हा जगातील अद्भूत चमत्कार..भन्नाट आयडिया ..इंजिनिअरचे भगीरत प्रयत्न ..साकार झालेलं स्वप्न ..सलग पाच
टप्प्यातला डकी भरविणारा–मृत्युच्या दाढेतला जीवघेणा प्रवास..खालती खोलदरी..डोंगरावर लोंबकळणा ऱ्या झाडाच्या फांद्यावर पडलेल पांढरे शुभ्र बर्फ..खडकावर बर्फाचा सडा..दिसेल तिथून फटीतून अवघडत बघत होतो.कलतझुलत वरती जाणारी ट्राम सुनिता कावरी बावरी झाली रडू लागली.रविन
तिला सावरल .आत 40 ते 50तरी प्रवासी असावेत .काही उभे तर भांबावलेले मिळेल त्या जागेत खाली बसलेले ..
एकदाचे 8516 फुट उंचीच्या शिखरावर पोहोचलो .इशाऱ्याला न जुमानता ओला लाकडी जिना उतरत Mount Junction इथ आलो .सर्वत्र भुसभूसित बर्फच बर्फ .कधी कधी सुनीताच्या धाडसच कौतुक करावस वाटत,तीही घाबरत थरथरत आली.श्रावक रवि एकमेकावर बर्फ फेका फेकीचा खेळ खेळू लाग ले. मलाही सुनीताच्या अंगावर बर्फ फेकण्याचा मोह आवरला नाही .बर्फाच्या गोळ्यान माझे हाथ बधीर झाले.सुनिता थंडीन-झोम्बणाऱ्या वाऱ्यान बेजार झाली.डोंगर पायथ्याशी सर्वत्र लाखो दिवे चमकत होते , खाली बर्फाचा घसरता भाग धोक्याचा त्यात रात्र पडली.परिस्थितीच गांभीर्य ओळखून पटकन हॉलमध्ये आलो.आतली उब थंडी पळाली.इथंही सुनीताच रडण-थरथरण चालूच,तिला धीर ध्यायाला रवि तयार होताच..नजर जाईल तिकड हॉटेल्स,चकचकीत मॉल्स,सजलेली दुकान,विक्रीच्या वस्तूंची रेलचेल, खातपीत हिंडणारे दर्दीप्रवाशी,कंठाळा असा आला नाही.एकूण दोन ट्राम्स.एक वरती येण्यासाठी व दुसरी खाली जाण्यासाठी.खाली येताना मात्र भीती अजिबात वाटली नाही .हवेन उशी टम्म फुगावी तशी थंडी वाढली.जवळच बस थांबली होती .पटकन आत घुसलो अन क्षणात पार्किंगच्या जागेपर्यंत आलोही . लॉजच्या ओढीन निघालो .डोंगर पायथ्याशी हजारो पवन चक्क्या–आखीव पट्टयात गरागरा फिरत होत्या. जणू डोलणारी शेतमळीच..रस्त्यात भल्या मोठ्या जागेत लहान मोठी शेकडो विमान विश्रांती घेत होती .
लॉजवर जाण्यापूर्वी जेवण करण्याचा बेत सर्वांनी आखला.शोधाशोधीत बराच वेळ गेला.रस्त्यातील नेत्रदीपक रोषणाई लाजबाब .कारण इथ 26 th Annual International Film Festival 2015,दि . 1 जानेवारी ते 5 जानेवारी च्या दरम्यान सुरु होणार होता.एका कोपऱ्यात अंधारात चार्ली चाप्लीन सारखी व्यक्ती उभी आहे तिथ जाऊ अन फोटो काढू म्हणताच सर्वजण तिकडे गेले.मी मात्र पेट्रोल पंपाजवळ कार मध्ये बसून राहिलो.त्या ठिकाणी प्रत्यक्षात चार्लीच्या वेषात एक महिला अंधा-या रात्री-निर्मनुष्य ठिकाणी एका कंपनीची जाहिरात करत होती.बोलाबोलीत-फोटो काढताना तीही सुखावली.एक तासांनी Nico Linos Cathedral City या हॉटेलात कसबस खाऊन झाल..[ अमेरिकेत कुठही जा खा –पोट भरत नाही अन समाधानाचा ढेकरही देता येत नाही.मुलाला तर मुळीच सांगता येत नाही,त्याचे डॉलर मात्र वाया जातात,असा आमचा अनुभव] लॉजवर आलो.दि .31-12-2014सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस तोही क्यालीफोर्नियात, हा सुखद अनुभव !
नवीन वर्षाचा पहिला दिवस....लॉजमध्ये ब्रेकफास्ट मोफत होता.बुफे प्रमाणे मांडणी,भरपेट नाष्टा झाला .हातीएक सफरचंद घेऊनच बाहेर पडलो.जीम जवळच होती,व्यायाम करता आला नाही.अशी संधी मी सहसा सोडत नाही.भव्य काचेच्या तावदानातून पोहण्याचा तलाव दिसला.तिथ गेलो.छत्रीखाली बसायला मोठाल्या शोभिवंत छत्र्या अन गोल टेबल खुर्च्या होत्या.शोभिवंत पामची झाड,पांढ-याशुभ्र बर्फान झाकाळलेल्या डोंगराच्या रांगा स्वच्छ आकाश जमिनीन पांघरलेली बर्फाची शाल व नजर जाईल तिकड हिरवळच हिरवळ ..पंकज- रविन नाना प्रकारचे फोटो काढले.लख:प्रकाश असूनही गारवा जाण वत होता.Sea-World च्या ओढीन सामानासह निघालो तिथ पोहोचायला जवळ जवळ तीन तास लागले.50 वर्षे पूर्ण झाल्यान अख: परिसर सजला होता .ख्रिसमस–नवीन वर्षाच्या सुट्ट्या त्यामुळे प्रचंड गर्दी दिसली.आत शिरताना तिकीट तपासणी झाली .पुरावा म्हणून हातावर शिक्के मारले गेले.काय बघाव अन काय नको अस झाल.गोरी माणस त्यांची गोंडस मुल आपआपल्या नादात होते.प्रवेश दाराजवळ वाहत पाणी होत,हात घालतच एटूकले मासे स्पर्श करू लागले गुदगुल्या झाल्या.गम्मत वाटली .काही अंतरावर Sea-Horse,पाठीवर छानदार नक्षी असलेल इवलस कासव, न पाहिलेल्या शेकडो जलचर प्राण्यांना बघून डोळे दिपले.पाहिलेली स्थळ व शोज असे होते.
Sea-Lion & Otter Stadium:सी लायन शो.वेळ 1.30 स्टेडियम गोलाकार अति भव्य होत .समोरचा निळाईतला स्टेज नजरेत मावत नव्हता.स्टेजच्या भोवताली खोलवर नीळ पाणी त्यावर पडणारी रंग बदलणारी लाईट शोभा वाढवत होती .स्टेजवर धुंद फुंद आवाजात स्टेज वरील कलाकार
करमणूक करत होते .इशारा करताच संगीताच्या तालावर प्रचंड देहाच्या सी .लायन्सच्या करामती सुरु झाल्या.गोल गोल फिरण,शेपट्या हलवण,उंचावर जाऊन पाण्यात धाड्कन आपटण प्रेक्षकांच्या अंगावर पाणी उडवीण, अचानक स्टेजवर जाण.दुडू दुडू रांगण.. ओंजळभर माशांचा खाऊ मिळताच घसरत पाण्यात जाण,गडप होण याला तोड नव्हती .वरून प्रखर नानाविध रंगाचे पट्टे कधी स्टेजवर कधी सी लायनवर तर कधी प्रेक्षकवर पाडत शोभा वाढवत होते.असा हा देखणं खेळ 20 मिनिटापर्यंत चालला .
डाल्फीन शो [ Dolphin Studio ]-विस्तीर्ण खुले स्टेडियम सुरेख असे तीन स्टेज अन वेगवेगळे भव्य तीन पडदेही..अख: स्टेडियम नीळ..खचाखच भरलेल..समोरच्या पाच सहा रांगा मोकळ्या होत्या.अगदी खालच्या रांगेत एकच गोरा माणूस मेणकापड पांघरून मुलासह बसलेला दिसला.अंधारात पडदा सुरु झाला.सदरहू कार्यक्रम –निसर्गाची किमया आदी चित्र फिती दाखविल्या गेल्या.यावेळी तिन्ही पडदे एकत्र आले अन एक विशाल असा पडदा बनला.एक देखणी लहान मुलगी स्टेजवर आली अन संगीताच्या ठेक्यात नाचू गाऊ लागली.विशाल अशा पडद्यावर तिची छबी अन त्याचबरोबर मनोरंजन करणारे डॉल फिनहि दिसू लागले.पडदा थांबला.आत्ता डॉल्फिनच्या करामती/कवायती सुरु झाल्या.खोल पाण्यातून वरती उत्तुंग झेप घेण,धाडकन पाण्यात आपटण,गायब होण,कुठूनतरी डोक काढत स्टेजवर येणशेपट्या हलविण,सरपटत चालण,बघ्यांच्या अंगावर पाणी शिम्पडण,अभिवादन करण,सर्वांनी सामुदाईक नृत्य करण असे आयटेम दाद देण्यासारखे होते.हाच कार्यक्रम आंखो देखा पडद्यावर अधून मधून दिसत होता,खरा कोणता पडद्यावरील कोणता कळत नव्हत.हा मनोरंजनात्मक शो 20मिनिटापर्यंत चालला  
Shamu Khrismas Miracle [ शामू स्टेडियम ] वेळ सां.5.30 एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणच अंतर बरच होत.गर्दीतून चालताना दमछाक होत होती तरी आतले चकचकीत विविध स्टोल्स त्यावरील
रोषणाई,तळत/भाजत असलेल्या पदार्थांचा खमंग/उग्र वास..नानाविध गोरे लोक,परीला लाजवील अशा देखण्या बायका,सोनेरी केसांची गुबगुबीत मुल,त्यांचा पेहेराव प्रत्येक क्षणी उत्सुतका वाढत होती.तशात
संघा–कल्पना दिसतील त्या रायीडसची मजा लुटत होते.एकदाचे या ठिकाणी आलो.हा शेवटचा शो होता .सदरहू स्टेडियम गोलाकार अन दूरवर पसरल होत.इथंही निळ्या रंगाचा वापर खुबीन केलेला आढळला
.स्टेजवर एक वृध्द कलाकार गिटार वाजवीत मनोरंजन करत होता.अचानक अवाढव्य माशाच्या पाठीवर बसून एक मुलगी आली,भर्कननिघून गेली.सर्कशीतले कलाकार उंच झुल्यावरच्या कसरती करतात तशा उंचावरून कलाकार कशाही उद्या पाण्यावर मारत होते .नंतर माशाच्या करामती /कवा यती /गमती सुरु झाल्या .अगोदरचे दोन्ही शोज पहिल्याने वेगळ अस वाटल नाही पण मोकळ्या ग्यालरीत खेटून बसून बघताना फोटो काढताना/ खाताना क्षीण मात्र हलका झाला.पांढरे पक्षी स्टेजला
उगीचच फेऱ्या मारत होती.विमान अगदी डोक्यावरून जात होती,दिसत होती.दिसेल तेव्हड बघून चालून खाऊन झाल.ब्यागा गाडीत होत्या.आदल्या रात्रीहॉटेल शोधतान–बरीच रात्र झालेली,पंकजला म्हणालो ‘एखाद्या भारतीय हॉटेलमध्ये जेऊया‘.गुगलवर हॉटेल शोधल,नाव होत Paassage to India– Encinitas-C.A.भारतीय पद्धतीच रुचकर जेवण मिळाल.हॉटेल मालकीण गुजराती होत्या,हिंदीतून बोलल्या . नंतर Ramada Carlsbad या हॉटेलात उतरलो .दोन स्वतंत्रखोल्या रूम नं.215मध्ये रवि कल्पना श्रावक होते तर संघासह आम्ही 216त.लॉस अन्जेलीस मधील नवीन वर्षाचा असा हा ऐति हासिक दिवस सार्थकी लागला.
Lego Land Resort [ Corritos City-Fun Town ]
शुक्रवार 2-1-2015 रामदा लॉज सोडताना सकाळी ब्रेकफास्ट म्हणावा असा नव्हता.तरी परंतु खाणगरजेच होत,फ्री होत.सकाळी 10.30ला लेगोल्यांडच्या दिशेन निघालो.ठिकाण जवळच होत .पंधरा वीस मिनिटात तिथ पोहोचलोसुद्धा .तिथ तुफान गर्दी दिसली.चारपदरी मार्ग असूनसुद्धा मुंगीच्या पावलान रांग पुढ सरकत होती.पार्किंगच्या जागेपर्यंत यायला बराच वेळ गेला .लाखभर तरी वाहन असावीत.कडक उन्हात गारवा जाणवत होता.कशीबशी पार्किंगला जागा मिळाली.समोरच विविध रंगातील एखाद मंदिर असाव अस Lego Land Hotel खूप शोभून दिसल.भव्य गेटमधून आत आलो .डाव्या बाजूस लेगोधारी उभा होता तिथ फोटोसाठी लाईन लागलेली..रविला फोटोचा मोह अनावर झाला नाही,तिथ फोटो निघालाच.शेजारच्या Duplow Villageभागात गाजलेल्याThe Lego Movieचा इवलासासेट जसाच्या तसा जपून ठेवल्याच आढळल.त्यात.दाटीवाटीतल्या उंच इमारती ,सुरेख रस्ते,बैठे बंगले,टेकड्या,झाडी,रस्त्यातल्या कार्स ,माणसांची वर्दळ ..ई. भव्य पडद्यावर अस्सल कस दिसत असेल याच नवल वाटल.
लवकर येतो म्हणून श्रावकला घेऊन गेलेला रवि दीड तासांनी आला.दरम्यान मी सुनिता कल्पना संघा व मेश्राम परिवारान छोट्याशा बोट सफारीचा आनंद घेतला.वळणा वळणातून जाणा-या बोटीत सर्वजण बसलो.किनाऱ्यावरची गर्द झाडी,हिंडणारी बदक,आश्चर्य एका कोप-यात ताज महालची देखणी कलाकृती बघताना उर भरून आला .आसपास आयफेल टॉवर,सिडने,चीत्कारणारा डायनोसर,हत्ती,खडकात हलणारे डोळे,आणि बरच कांही होत.मेश्रामन मुलांच्या आग्रवाखातर दुसरी राईड घेतली. शोधाशोध करत रवि आला.भुका लागलेल्या..एका हॉटेलात आलो.थंडी आमचा पिच्छा सोडत नसल्यान-उन्हात गोल टेबला भोवती सार्वजण बसलो.मुलांनी आवडीचे पदार्थ घेतले.मी नुडल्स.समंध प्लेटभर न पाहिलेल्या तुरट चवीच्या न गिळता येणाऱ्या नुसत्या भाज्याच भाज्या..कुठेतरी नुडल्स सापडत, मुस्लिमाच्या लग्नात बिर्याणी खाताना एखादा मटणाचा पीस मिळावा तसा....चावण्यापेक्षा गिळत राहिलो.शेजारची युवती नुसत्या भाज्याच गपा गपा खात होती चोरून पाहिलं.
तिथून Mini Land इथ आलो.छोट्या छोट्या अगदी खेळण्यातल्या विटा वापरून–जोडून सुरेख इमारती तयार करून ठेलेल्या होत्या त्या वाकून बघितल्याशिवाय दिसत नव्हत्या.त्यात न्यूयार्क शहर,स्वातंत्र्य देवीचा पुतळा,मोनुमेंट,बैठी घर,छोटासा जलाशय,नागमोडी रस्ते,हिंडणारी माणस,जाणाऱ्या पार्क केलेल्या कार्स,दुतर्फाची झाडी,हिरवळ,पशु पक्षी जिवंत वाटले.इवल्याशा विटा कितीलागल्या असतील याचाअंदाज न केलेला बरा.साठ एक प्रकारची बघण्याची [राईडस ]खेळण्याची ठिकाण होती.मध्यभागी भल्या मोठ्या गव्याचा तसेचधिप्पाड हरणाचा हिरवळीतील हुबेहूब पुतळा लाजबाब असाच ..डाव्या बाजूलाउंच जिराफ हाही पुतळाच मान वर खाली करत होता.उजव्या बाजूला जगप्रसिध्दव्यक्तींचे पुतळे लटकावलेले होते .ओळखीचे चेहरे त्यात आईन्स्टाईन तेवढे ओळखीचेवाटले.लाखो छोट्या विटा वापरून तयार केलेल्या या पुतळ्यांना तोड नाही.जवळच एक थियेटर दिसल तिथ दहा पंधरा मिनिटाचा 4D-Cartoon पहिला.मुल जाम खुष झाली.दरम्यान रविच्या मित्राचा फोन आला.तिसरा मुक्काम नरेश बसागडेयांच्या अलिशान घरात केर्रीटोस क्यालिफोर्निया इथ .जेवण तयार होत,सर्वजण चिकनवर तुटून पडले.गप्पा रंगल्या.
दुस-या दिवशी ईडली चटणी प्रती जेवण उरकून घराच्या ओढीन फिनिक्ष कडे निघालो.व्हिसा संपायला अजून तीन महिने शिल्लक होते.राहाण गरजेच.जाता येता रवि –पंकजन न थकता न चिडता 1500 मैला पर्यंत सुरेख ड्रायव्हिंग केली.नशीब कुणीही आजारी पडलं नाही सुखरूप फ़िनिक्षला पोहोचलो.नवीन वर्ष-क्यालिफोर्नियाला लाख लाख धन्यवाद !

Post a Comment

 
Top