Add

Add

0


    पत्रकारांच्या एस टी प्रवासाची मर्यादा पूर्वीप्रमाणे अमर्याद करावी
    असोशियशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया शाखा बीड.संघटनेची मागणी

बीड(प्रतिनिधी):- असोसिशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेच्या बीड जिल्हा शाखेची बैठक दिनांक 29 /6/2019 रोजी येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्हा अध्यक्ष किसन माने यांच्या अध्यक्षतेखाली होऊन विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली त्यात मागील 12 वर्षांपासून मोफत असलेल्या पत्रकारांच्या एस्टी प्रवासावर शासनाने 8000 किमी.ची  मर्यादा घातल्याने पत्रकरांतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.पत्रकारांच्या मोफत प्रवासाची सेवा पूर्वीप्रमाणे अमर्याद मोफत करावी आशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने कांहीं ठराव घेण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष के डी चंडोला यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना बैठकीत यावेळी सदस्यांनी ईश्वराला केली
तसेच शासकीय जाहिरात संदेश धोरण-2018मधील जाचक अटी रद्द करण्यासाठी संघटनेच्या राज्य पदाधिाऱ्यांनीही शासनाच्या दारात बसून अटी शिथिल करून घेऊन ज्या वृत्तपत्रांना दर वाढ दिली नाही त्यांना मिळवून द्यावी अशी विनंती करणारा ठराव यावेळी करण्यात आला आहे.  त्यासाठी बीड कार्यकारिणी सदस्य त्यांच्याबरोबर स्वखर्चाने हजर राहतील.त्यासाठी राज्य पातळीवर बैठक घ्यावी  व सर्वानुमते  रास्त अडचणी सरकारसमोर मांडाव्यात, तसेच गेल्या 12 वर्षांपासून शासन पत्रकारांना मोफत  प्रवास सवलत पास देत होते परंतु यावर्षी तीन महिन्यानंतर अचानक प्रवासासाठी 8000० km.  मर्यादा घातली आहे ती सवलत पूर्वीप्रमाणे अमर्यादित मोफत प्रवास सवलत चालू ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. सहकार खाते,  नगर पालिका व जिल्हा परिषदेच्या वर्गीकरण जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना प्राधान्याने द्याव्यात त्यासाठी संबंधिताकडे पाठपुरावा करावा असे ठरले. 
बैठकीस संघटनेचे राज्य सचिव प्रदीप कुलकर्णी,  जिल्हाध्यक्ष किशन माने, जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव वाघ, राज्य कार्यकारिणी सदस्य दत्तात्रय दमकोंडवार,सुहास देशमुख, सुंदर देशमुख, प्रचंड सोळंके, बंडू खांडेकर, नवनाथ माने यांच्या सह अनेक संपादक  उपस्थित होते.

Post a Comment

 
Top