Add

Add

0
            सिने नाट्य कलावंतांच्या उपस्थितीत रंगला मोरया
               प्रतिष्ठान, मुंबई चा एकांकिका महोत्सव  ...! 

मुंबई (महेश्वर तेटांबे ):- मोरया प्रतिष्ठान, मुंबई आयोजीत दिवंगत चंद्रमणी तुर्भेकर लिखित एकांकिका महोत्सव सोहळा गुरुवार दिनांक 25 जुलै, सायंकाळी 4 ते 9.30 या कालावधीत मुंबई च्या साहित्य संघ मंदिर, गिरगाव या नाट्यगृहात संपन्न झाला.सोहळ्याची सुरुवात दिवंगत चंद्रमणी तुर्भेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली , तसेच संस्थेच्या हस्ते मान्यवर उपस्थित कलाप्रेमी यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी दिवंगत चंद्रमणी तुर्भेकर यांच्या सहवासातली काही सुखद अनुभव आपल्या भाषणातून व्यथित केले. त्याचबरोबर दिवंगत चंद्रमणी तुर्भेकर यांच्या  स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांनी दिलेल्या अमुल्य अशा योगदानासाठी एक आठवण म्हणुन त्यांच्या स्वलिखित अशा या एकांकिका महोत्सवात महेंद्र दिवेकर दिग्दर्शित,अभिषेक वैशंपायन यांनी संगीतबद्ध केलेल्या तसेच श्याम चव्हाण यांच्या तेजोमय प्रकाश योजनेतुन साकारलेल्या अनुक्रमे "साठा पत्रोत्तराची कहाणी असफल अपुर्ण", "कारगील" आणि  " विक पॉईंट " इत्यादी एकांकिकाचे सादरीकरण करण्यात आले या प्रसंगी चंद्रमणी यांच्या 90 वर्षीय मातोश्री यांची त्यांच्या भारदस्त आवाजात चंद्रमणी गौरवपर चित्रफीत सादर करण्यात आली याप्रसंगी प्रमुख मान्यवर माननीय सौ.प्रतिभा ताई पाटील,दिवंगत चंदमणी यांच्या पत्नी कविता चंद्रमणी तुर्भेकर,मा. मोहनदादा गोरेगावकर,मा.महेंद्र गमरे ,मा.विठ्ठल जाधव,मा.राम दौंड, सुरेश गांगुर्डे, अभिनेत्री वर्षा दांदळे , अभिनेते महेश्वर तेटांबे , बबन जोशी , महेंद्र दिवेकर, संदेश जाधव , सुनील जाधव , सुरेश डाळे , पत्रकार नंदकुमार पाटील , कला दिग्दर्शक सुनील देवळेकर , मोरया प्रतिष्ठान चे मानद सदस्य श्री विलास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते 
या सर्व सोहळ्याचे सूत्र संचालन मोरया प्रतिष्ठान चे मानद श्री वैशंपायन गमरे आणि आपल्या खुमासदार शैलीने करून कार्यक्रमात रंगत आणली आणि केवळ दिवंगत चंद्रमणी यांच्या प्रेमाखातर हि कलावंत मंडळी उपस्थित होती तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटी वैशंपायन गमरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले अशा तऱ्हेने हा एकांकिका महोत्सव थाटात संपन्न झाला...! 
महेश्वर भिकाजी तेटांबे 

Post a Comment

 
Top