Add

Add

0
                 अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
                         पौड येथे मोफत पोल्ट्री प्रशिक्षण ... 

पौड (प्रतिनिधी ):- महाराष्ट्राचे मा.उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पौड येथे मुळशीतील शेतकर्यांनसाठी रविवार दि.28 रोजी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे उपाध्यक्ष योगेश ठोंबरे यांनी मोफत पोल्ट्री प्रशिक्षण आयोजित केले होते.या प्रशिक्षणात 70 प्रक्षिणार्थींनी सहभाग घेत ला होता.प्रशिक्षण घेणाऱ्या शेतकर्याना महाराष्ट्र शासन मान्य,आय एस ओ मान्यताप्राप्त प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.या प्रसंगी पुणे जिल्हा दुध संघाचे संचालक रामचंद्रभाऊ ठोंबरे यांनी तरुणांनी  नोकरीच्या मागे न लागता शेतीपूरक व्यवसाय उभे करावेत असे आवाहन प्रक्षिणार्थींना केले.
  मुळशी तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष महादेवआण्णा कोंढरे.माजी अध्यक्ष सुनिल चांदेरे या मान्यवरांची भाषणे झाली.तसेच कार्यक्रमाला मा.सभापती कोमलताई वाशिवले.कार्याध्यक्ष अंकुश मोरे,ओ बी सी सेलचे अध्यक्ष बाळासाहेब झोरे,जितेंद्र ईंगवले,युवकचे अध्यक्ष निलेश पाडाळे आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन उत्तम ठोंबरे यांनी केले.अनिल मालुसरे यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top