Add

Add

0
                टिटवाळा उद्योजक फोरमच्या माध्यमातुन 
        उद्योजकांना नक्कीच फायदा होईल-सौ.उपेक्षाताई भोईर..

     टिटवाळा-(महेश्वर टेतांबे ):-- व्यावसायिकांची एकसंघता,रोजगार उपलब्ध करुन देणे,आपआपले व्यवसाय वाढविणे,इतर व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे या उद्देशाने एकत्र येऊन स्थापन झालेल्या टिटवाळा उद्योजक फोरमची सभा नुकतीच विद्यामंदीर शाळा,मांडा टिटवाळा येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उप महापौर सौ.उपेक्षाताई भोईर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.टिटवाळा उद्योजक फोरम हा टिटवाळ्यातील स्थानिकांना नक्कीच लाभदायक ठरेल,आशावाद सौ.उपेक्षाताई भोईर यांनी व्यक्त केला.व अशा प्रकारचा उपक्रम टिटवाळ्यात सुरु केल्याबद्दल त्यांनी संस्थापकांचे आभारही मानले.याप्रसंगी मेटा फिल्म्सचे समिर सुमन यांनी बिझनेस प्रेझेंटेशन,सोशल मिडीयाद्वारे प्रभाविरित्या प्रमोशन कसे करावे याचे मार्गदर्शन केले.यावेळी डाँ.निता पाटील,डाँ.अमितकुमार,प्रभाकर भोईर व इतर व्यावसायिक उपस्थित होते.अध्यक्षांनी उपस्थितांचे आभार मानले,व त्यानंतर सभेची सांगता झाली.

Post a Comment

 
Top