Add

Add

0
                   पक्षाच्या आघाड्या आणि सेल बळकट करा... 
                     राष्ट्रवादी काँग्रेसचा  पदाधिकाऱ्यांना मंत्र


                                    राष्ट्रवादी कॉंन्ग्रेस च्या ओबीसी सेलची पुण्यात बैठक संपन्न .... 

पुणे (प्रतिनिधी ):- राष्ट्रवादी काँग्रेस च्या पुणे शहर आणि पुणे जिल्हा ओबीसी सेल च्या कार्यकारिणीची बैठक 17 जुलै रोजी निसर्ग मंगल कार्यालय (मार्केट यार्ड ) येथे झाली . पक्षाच्या सर्व आघाड्या आणि सेल बळकट करा ,त्यातून जनतेशी संवाद वाढवून पक्ष बळकट करा ,असा मंत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या   पदाधिकाऱ्यांना देण्यात आला . पक्षाच्या सर्व आघाड्या आणि सेलचे प्रदेश समन्वयक सुहास उभे यांचा नियुक्तीबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला .

'माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ,खा.सुप्रिया सुळे,प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी खास सूचना दिल्या असून विधानसभा स्तरावर पक्षाच्या सर्व  आघाड्या आणि सेल नव्या कार्यकारिणीसह कृती कार्यक्रम घेवून जनतेसमोर येणार आहेत .हा कृती कार्यक्रम धडाक्यात यशस्वी करा ' , असे आवाहन प्रदेश समन्वयक सुहास  उभे यांनी केले
बुधवार दिनांक 17 जुलै पुणे जिल्हा व पुणे शहर ओबीसी  सेल ची बैठक निसर्ग कार्यालय पुणे या ठिकाणी झाली. यावेळी  ओबीसी सेलचे  प्रद्रेशध्यक्ष ईश्वर  बाळबुधे ,पुणे जिल्हाध्यक्ष  प्रदीप गारटकर ,पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे , प्रदेश समन्वयक सुहास  उभे  यांनी  मार्गदर्शन केले .  आगामी   विधानसभा निवडणुकीत   पुणे जिल्हातील जागा जिंकण्यासाठी  कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी ओबीसी  सेलच्या माध्यमातून सज्ज रहावे, राष्ट्रवादी पक्षाचे काम सेलच्या पदाधिकारी यांनी समाजातील तळागाळापर्यंत जावून पोहचावे ,म्हणजे विधानसभेला सर्वाधिक  आमदार निवडून येतील . बहुजन समाजासाठी ,प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक शरद पवार यांनी सर्वाधिक योगदान दिले आहे . त्याची माहिती कार्यकर्त्यांनी शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवली पाहिजे ,असेही आवाहन करण्यात आले . 
यावेळी ओबीसी सेलचे  प्रद्रेशध्यक्ष ईश्वर  बाळबुधे पक्षाच्या सर्व आघाड्या आणि सेलचे प्रदेश समन्वयक सुहास उभे ,ओबीसी  जिल्हाध्यक्ष  शिवदास उबाळे,संतोष नांगरे(ओबीसी सेल पुणे शहराध्यक्ष),रुपेश आखाडे (पुणे)  ,नितीन शेंडे (बारामती),  राज पाटील( इंदापूर), शिवाजी झगडे , सौ नुसरत इनामदार( बारामती) ,संदिपान वाघमोडे (दौंड ),बाळासाहेब झोरे( मुळशी ),संदीप थोरात( वाघोली) तसेच सेल चे सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते.                                                                             

Post a Comment

 
Top