Add

Add

0
    पत्रकार संघ मुळशीच्या अध्यक्षपदी रमेश ससार यांची फेरनिवड 
      तर कार्याध्यक्षपदी लोकमतचे प्रदीप पाटील बिनविरोध.                                                  
पौड (प्रतिनिधी ):-धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या पत्रकार संघ मुळशी च्या अध्यक्ष पदी सकाळ चे रमेश ससार तर कार्याध्यक्ष पदी लोकमत चे प्रदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली. संघाच्या पौड येथील पत्रकार भवनात झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्या कार्यकारणी ची घोषणा करण्यात आली . 
संघाचे मावळते अध्यक्ष राजेंद्र मारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेला  संघाचे संस्थापक अध्यक्ष धोंडिबा कुंभार,संघाचे मार्गदर्शक  दत्तात्रय सुर्वे,नीलेश शेंडे,बबन मिंडे, दत्तात्रय उभे, दत्तात्रय जोरकर, केदार कदम , रामदास दातार आदी पत्रकार सभासद उपस्थित होते
यावेळी निवडलेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे यावेळी निवडलेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे -    
अध्यक्ष - रमेश  ससार ( सकाळ ) ,  कार्याध्यक्ष -  प्रदीप पाटील( लोकमत), उपाध्यक्ष - सागर शितोळे (पुढारी)  व साहेबराव भेगडे (लोकमत) , सचिव - मकरंद ढमाले ( सकाळ) ,सहसचिव - कालिदास नगरे (लोकमत) , खजिनदार- महादेव  पवार (सकाळ).             
यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. 

Post a Comment

 
Top