Add

Add

0
             मोहोळ नगरची आदिवासी वसती सुदर्शन सुधाकडून दत्तक 
   अंबडवेट येथे फळझाडे भेट देऊन ग्रामविकास प्रकल्पांचा प्रारंभ 
पौड (प्रतिनिधी):- मुळशी तालुक्यातील  सुतारवाडी येथील सुदर्शन सुधा या सामाजिक प्रकल्पा अंतर्गत अंबडवेट येथे सुदर्शन कंपनीने येथील मोहोळ नगर कातकरी वस्ती दत्तक घेतली आहे त्याशिवाय येथील शेतकऱ्यांना आंबा,चिकू,फणस या सारख्या फळझाडांचे वाटप करण्यात आले. 
सुदर्शन सुधा या सामाजिक प्रकल्पा अंतर्गत मुळशी तालुक्यात शिक्षण,आरोग्य,शेती,स्वच्छता या विषया बरोबरच रोजगार निर्मि ती या सारखे ग्रामविकासाचे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सुदर्शन केमिकल च्या वतीने अंबडवेट (ता. मुळशी )येथे आदिवासी वस्ती दत्तक योजना,आदिवासी मुलांकरिता अभ्यासिका, रोजगार प्रशिक्षण हे उपक्रम मोहोळ नगर वस्तीत सी एस आर प्रमुख माधुरी सणस यांच्या मार्गदर्शखाली सुरू केली असल्याची माहिती सी एस आर अधिकारी वैशाली मुळे यांनी दिली. 
आर.सी.डी हेड सॅम व फ्रॅंक या परदेशी पाहुण्यांच्या हस्ते अंबडवेट गावातील शेतकऱ्याना फळझाडे वाटप करण्यात आली.तसेच मोहोळ नगर येथे सार्वजनिक वृक्षारोपण करण्यात आले. 
यावेळी गोरख पवार,प्रमोद दळवी,सचिन होळकर,रविकिरण सावंत, सी. एस. आर च्या अधिकारी वैशाली मुळे, ग्रामपंचायत सदस्य, सुनील आमले, अनंत ढमाले ग्रामसेवक मारुती घोळवे आदी उपस्थित होते. सुनील आमले यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे स्वागत व आभार मानले. 

Post a Comment

 
Top