Add

Add

0

आयआयएफडब्ल्यू सिझन -3 ने “आयआयएफडब्ल्यू एनएक्सटी- दि इंटिमेट फॅशन टूरच्या” च्या माध्यमातून  शिरपेचात रोवला आणखी एक मानाचा तुरा
-  इंडिया इंटिमेट फॅशन वीक नॅशनल टूरची पुण्यातून सुरूवात
-        8 शहरांत होणारी ही टूर आता गोवा, दिल्ली, बंगलोर, मुंबई आणि अशा अन्य शहरांत होणार
-        फ्रेंच अंतर्वस्त्रे आणि बीचवेअर ब्रॅन्ड ‘ऑबाद’ चे या कार्यक्रमात अनावरण
पुणे (प्रतिनिधी ):- सातत्याने दोन मौसम यशस्वी केल्यानंतर आता इंडिया इंटिमेट फॅशन वीक (आयआयएफडब्ल्यू) या भारतातील एकमात्र अशा अंतर्वस्त्र आणि  इंटिमेट वेअर साठी असलेल्या फॅशन वीक तर्फे आता आपल्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून 11 जुलै 2019 रोजी त्यांनी पुणे येथील सर्वांत चांगल्या लक्झरी नाईट क्लब असलेल्या कल्ट हाऊस येथे “आयआयएफडब्ल्यू एनएक्सटी- दि इंटिमेट फॅशन टूरचे” आयोजन  केले होते. आयआयएफडब्ल्यू तर्फे अभिमानाने प्रथमच फ्रेंच अंतर्वस्त्रांचा आणि बीचवेअर ब्रॅन्ड ‘ऑबाद’ चे अनावरण केले आहे.  ऑबाद ने आयआयएफडब्ल्यू आणि कँडी शॉप (इंडिया) बरोबर सहकार्य करून देशात आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.  कंपनी आता भारतात 25 आंतरराष्ट्रीय अंतर्वस्त्रांचे ब्रॅन्ड्स आणण्यात येणार आहेत.  याचबरोबर अंतर्वस्त्रांची विक्री आता ई कॉमर्स च्या माध्यमातूनही होणार आहे.
आयआयएफडब्ल्यू च्या ‍ तिसर्‍या वर्धापनदिनाचे  निमित्त साधत त्यांनी आयआयएफडब्ल्यू एनएक्सटी- दि इंटिमेट फॅशन टूर अधिक मोठी आणि चांगली करण्याची संकल्पना पुढे आणली आहे.  आयआयएफडब्ल्यू एनएक्सटी ही संकल्पना अनोखी असून  यांत  प्लस साईझ, नवीन फॅशन आणि वैयक्तिक स्वच्छतेचा दृष्टिकोन यांचा समावेश करण्यात आला आहे.  मोठा आकार निषिध्द मानल्या गेलेल्या समाजातही आता इंटिमेट फॅशन आणि वैयक्तिक स्वच्छतेला प्रधान्य देण्यात येत आहे.       
ऑबादचे देश प्रमुख आणि सीईओ श्री ग्रेगरी गो हिल यांनी सांगितले “ अतिशय चांगल्या अशा भारतीय बाजारपेठेत आमची उत्पादने सुरू करतांना आंम्हाला खूपच आनंद होत आहे.  आयआयएफडब्ल्यूच्या मंचावरून आणि चांगल्या टिम बरोबर काम करण्याची ही मोठी संधी आहे.  या अनावरणासाठी आम्ही गेल्या दोन महिन्यांपासून संपर्कात होतो आणि आता उद्घाटनाची उत्सुकता खूप मोठ्या प्रमाणावर  वाढली आहे.  भारतीय बाजारपेठ ही वाढीसाठी खूपच अनुकूल आहे.  भविष्यातील या बाजारपेठेचा एक भाग होण्याची संधी मिळणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो.” 
ते पुढे म्हणाले “ दि ऑटम विंटर 2019/80 ऑबाद कलेक्शन च्या माध्यमातून ऑबाद पुन्हा आर्ट नुव्हो फॉर 2019/20 ऑटम विंटर सिझन मध्ये आगमन करत आहे. ऑबाद हे शक्तीशाली महिलांचे प्रतीक आहे.  त्या आत्मविश्वासाने युक्त आणि लक्ष्याचा वेध घेणार्‍या आहेत.  ऑबाद   महिला या स्वतंत्र ‍विचारांच्या आहेत व अतिशय मजबूत विचारांच्या म्हणजेच साराह बर्नहार्ट, माता हरी आणि इसाडोरा डंकन यांसारख्या ऐतिहासिक महिलांचे प्रतिनिधीत्व करतात. या अधुनिक, मुक्त आणि आकर्षक महिला या ऑबाद च्या प्रतिबिंब आहेत.  या महिलां साठी ऑबाद तर्फे डेलिकेट लाँजरी सुरू केली असून यांत आराम आणि हवेशीरपणा बरोबरच एम्ब्रॉयडरीही आहे.  यांतील फुलांचे आणि निसर्गरम्य रंगांमुळे ऑबाद च्या ऑटम विंटर 2019/20 कलेक्शन मध्ये आर्ट नुव्हो च्या कलाकृतीं मुळे आकर्षक असे सौंदर्य खुलून येते त्याच बरोबर मुक्तता आणि प्रेमाचा अनुभवही मिळतो.”
जयपूर येथील डिझायनर जोडी असलेल्या छल्ली आणि मल्याज यांनी यावेळी  त्यांच्या ‘अभिसार’ अंतर्गत बीचवेअर ची श्रेणी प्रदर्शित केली,  यामध्ये संपूर्णत: भारतीय संस्कृतीचे घटक समाविष्ट करण्यात आले होते.  या कलेक्शन मध्ये हाताने विणलेले, बांधलेले, एम्ब्रॉयडरी, ॲप्लिक वर्क आणि अशा अन्य घटकांचा समावेश करण्यात आला आहे.  या कलेक्शन मधील रंगांत आकर्षक पिवळा आणि पीचेस सह मुव्हे, इंडिगो आणि सी ग्रीन सारख्या शेड्सचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी अनोखे वस्त्र प्रकार जसे कॉटन सिल्क, कोटा-डोरिया आणि सिल्क यांचा वापर केला आहे. तसेच रंग देण्याच्या तंत्रज्ञानामध्ये सॉलिड डाईज, टाय एन डाय, फोल्डिंग आणि क्लॅम्पिंग वर अधिक प्रमाणात भर देण्यात आला आहे. आयआयएफडब्ल्यू एनएक्सटी मध्ये नवोदित डिझायनर असलेल्या एनआयएफटी बंगलोर च्या असलेल्या सिमरन धोंड ला प्रथमच संधी देण्यात येत असून सिमनल ने आपल्या कलात्मकतेवर, संशोधनावर खूप काम केले असून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
आपल्या कलेक्शन विषयी बोलतांना सिमरन म्हणते “ लहानपणापासूनच मला जगभरांतील देवतांच्या गोंष्टींतून निर्माण झालेल्या बुध्दी, सौंदर्य, साहस आणि उदारतेचे आकर्षण राहिले आहे.  या देवतांनी महिलांना जी प्रेरणा दिली ती खूपच सक्षम करणारी आहे. एक अनोखी ओढ, मातृत्वाची आस, निर्दोषत्व आणि उर्जा यांमुळे या देवता प्रत्येक महिलेसाठी आदर्श ठरल्या आहेत. देवी श्रृंगार या संकल्पनेतून प्रत्येक महिलेला व्यक्तीपासून देवतेपर्यंतचा प्रवास करणे शक्य होते. हे कलेक्शन प्रत्येक व्यक्तीला जोडते विशेषकरून अशा वेळी ज्यवेळी आपण देवीचा विचार करतो त्यावेळी आपल्याला शंख,त्रिशूल, कमळ,पदर आणि आभूषणे आपल्यासमोर येतात.  अतिशय सखोल पणे  त्यांची आभा ही त्यांच्या मुर्तीं मधून, चित्रांमधून आणि अमरचित्रकथेच्या पुस्तकांतून आपल्याला पहायला मिळते. यांतील आभूषणे ही विशेषकरून या कलेक्शन साठी तयार करण्यात आली आहेत. काफी ॲमरस या इंटिमेट वेअर कलेक्शन मध्ये अंतर्वस्त्र आणि स्लीपवेअर चे प्रदर्शन करण्यात येणार आहे.”  
“एक जेन-नेक्स्ट डिझायन म्हणून आयआयएफडब्ल्यू एनएक्सटीचा एक भाग होतांना मला आनंद होत आहे.  ही खूप मोठी संधी आहे आणि मला हा सन्मान मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे. एक इंटिमेट वेअर डिझायनर असल्याने मी इंडिया इंटिमेट फॅशन वीक वर गेल्या काही दिवसांपासून नजर ठेऊन होते आणि कोणत्याही प्रकारे या संस्थेचा भाग होण्यास उत्सुक होते. मला जेन नेक्स्ट डिझायनर ‍विषयी कळले आणि मी खूप उत्साहाने कामाला लागले व इंटिमेट वेअर क्षेत्राचा अभ्यास सुरू केला, मला इंटिमेट वेअर क्षेत्रात अभ्यास करण्याची संधी मिळाल्याने आनंद होत आहे. मला आशा आहे की या मंचा मुळे मला अनोखा अनुभव तर मिळेलच पण त्याच बरोबर एक अविस्मरणीय प्रवास करण्याची संधी मिळेल.”ती पुढे म्हणाली.
आयआयएफडब्ल्यू  तर्फे कल्ट हाऊस बरोबर सहकार्य करारही या निमित्ताने करण्यात आला आहे.  कल्ट हाऊस हा पुण्यातील एक हाय एन्ड लक्झरी नाईट क्लब्ज पैकी एक आहे. आयआयएफडब्ल्यू बरोबरच्या सहकार्या विषयी बोलतांना कल्ट हाऊस चे भागिदार  ‍रिषभ बवेजा यांनी सांगितले “ या कार्यक्रमा करता मी खूपच उत्साही आहे आणि मला खात्री आहे की कल्ट सारख्या स्थाना मुळे हा शो अधिक ग्लॅमरस आणि आकर्षक होऊ शकेल.  आयआयएफडब्ल्यू बरोबरचा हा कार्यक्रम अतिशय चांगला होईल अशी मी आशा व्यक्त करतो.”
भारतीय फॅशन वीक मध्ये बू द टॅबू ची सर्व बंधने जोडण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहेत. इंडिया इंटिमेट फॅशन वीक चे संस्थापक आणि संकल्पनाकार श्री निरज जवंजाल यांनी सांगितले की ज्यावेळी अंतर्वस्त्रे, वैयक्तिक स्वच्छता आणि अशा अन्य बाबींची गोष्ट येते त्यावेळी आम्ही त्यांतून पातके दूर करण्यासाठी प्रयत्न करत असतो.  इंटिमेट फॅशन शी सबंधित क्षेत्रात प्रशिक्षण देण्यावरही आम्ही जोर देत असून त्याच बरोबर त्यासाठी पुढाकारही घेत आहोत. त्या उपक्रमांविषयी आम्ही लवकरच माहिती जाहीर करू. 2016 पासून आम्ही हा प्रवास सुरू केल्यानंतर आम्ही अधिक आकर्षक आणि प्रोत्साहक बनत आहोत, आता आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत, ब्रॅन्ड्स पर्यंत आणि कॉर्पोरेट्स पर्यंत पोहोचून आमच्या या भारतातील प्रवासात या क्षेत्रातील एक दिग्गज खेळाडू म्हणून पुढे येऊ शकू.”  
“आयआयएफडब्ल्यू तर्फे संपूर्ण भारतात 8 शहरांची टूर सुरू करण्यात येत असून या टूरची सुरूवात पुण्यातून प्रतिथयश ब्रॅन्ड्स, डिझायनर्स, फॅशनचे चाहते, माध्यम आणि प्रसिध्द व्यक्तीं च्या उपस्थितीत करण्यात येत आहे.  आयआयएफडब्ल्यू-एनएक्सटी दि  इंटिमेट टूरचा हे सर्वजण भाग असतील.  या टूर ची सुरूवात ही पुण्यातून होईल व नंतर गोवा, बंगळूरू, दिल्ली आणि अशा प्रकारे अन्य शहरांत जाईल.  दोन यशस्वी मौसमांनंतर तसेच आकर्षक अशा ब्लॅक मॅजिक कॅलेंडर तसेच काही आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड्सची सुरूवात केल्यानंतर आम्ही आता काही नाविन्यपूर्ण आणि कलात्मक दृष्टिकोनातून आयआयएफडब्ल्यूचे शोज सुरू करत आहोत.  अशा प्रकारे आम्ही पापाचा अंत करत अनोख्या राज्यात प्रवेश करत असतांना आम्ही असा विचार केला की फॉर्मल फॉर्मल शो टाईप पेक्षा अधिक काहीतरी चांगले आणि परिणामकारक मंच हा डिझायनर्स, ब्रॅन्ड्स, मॉडेल्स आणि जेन नेक्स्ट कौशल्यांना आम्ही आमच्या आयआयएफडब्ल्यू बरोबर काम करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.  म्हणूनच आम्ही आयआयएफडब्ल्यू एनएक्सटी  ही संकल्पना आणली,जिचा उपयोग आता अन्य शहरांतही करणे शक्य आहे.”‍ नीरज जवंजाल यांनी सांगितले.
आयआयएफडब्ल्यू एनएक्स्टी विषयी अधिक माहिती देतांना आयआयएफडब्ल्यू चे मिडिया हेड अमित पांड्ये यांनी सांगितले “ आयआयएफडब्ल्यू तर्फे सामाजिक समस्या असलेल्या बू द टॅबू विषयी जागरूकता ‍ निर्माण करत मुली आणि महिलांच्या स्वच्छते ‍विषयी माहिती देऊ करत आहोत.  आम्ही आंतराष्ट्रीय स्तरावरील अंतर्वस्त्रे आणि बीचवेअर ब्रॅन्ड्सचा भारतीय उपखंडात प्रसार करण्यासाठी प्रसिध्द आहोत.  आमचे नांव हे अधिक प्रोत्साहक तर आहेच पण त्याच बरोबर भारतीय ब्रॅन्ड्स आणि डिझायनर्स ना अंतर्वस्त्र क्ष्रेत्रात काम करून जगभरांत नांव मिळण्यास प्रोत्साहन देत आहोत. या व्यतिरिक्त आयआयएफडब्ल्यू  बरोबरच आंम्हाला आशा आहे की आम्ही डिझाईन शिक्षण क्षेत्रातही प्रवेश करत आहोत.  डिझाईन स्कूल मध्ये अधुनिक, जागतिक स्तरावरील विद्यार्थी असतील व त्यांना चांगली डिझाईन कौशल्ये शिकवण्यात येतील.  ही शाळा जगभरातील सर्वोत्कृष्ट शाळांपैकी एक असेल.”

Post a Comment

 
Top