Add

Add

0


    लवासा येथील पार्किंग शुल्क बंद करण्याची मागणी ?
        मुळशी तालुका भाजपा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सागर मारणे 
         
पौड (प्रतिनिधी ):-मुळशी तालुक्यातील लवासा येथे आकारण्यात येत असलेल्या अवाजावी पार्किंग शुल्कामुळे पर्यटकांनी या पावसाळ्यात लवासाकडे पाठ फिरवली असून या भागातील रोजगार पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तरी लवासा येथील पार्किंग शुल्क बंद करण्याची मागणी मुळशी तालुका भाजपा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी खासदार गिरीष बापट व लवासा प्रशासनाकडे केली आहे .    
        गेल्या काही महिन्यापासून लवासाने आत प्रवेश करण्याच्या ठिकाणीच पार्किंग शुल्क चालु केले आहे. लवासा देखभालीच्या नावाखाली  येणाऱ्या पर्यटकांकडुन दुचाकीस 200,चारचाकीस 500 तर मोठ्या गाडीसाठी 1000 रूपये शुल्क घेत आहे. परिणामी पर्यटक लवासा कडे पाठ फिरवत आहेत. लवासात जागा गेलेले जागा मालक येथे सेक्यूरिटी गार्ड, साफसफाई, हमालीची कामे करत आहे. त्यांनाही तीन ते चार महिने पगार मिळालेला नाही.
       मुठा गावापासून पासुन पुढे स्थानिकांनी टाकलेले निम्म्या पेक्षा जास्त लहान,मोठे - हॉटेल व इतर व्यवसाय बंद झाले झाले आहेत. पार्किंग शुल्क वाढवण्याच्या आगोदर लवासाला रोज हजारो पर्यटक येत होते ते प्रमाण सध्या खूपच कमी झाले आहे. परिणामी या भागातील तरुण बेरोजगार होत असून गुन्हेगारीकडे वळण्याची भिती निर्माण झाली आहे. जे स्थानिक ठेकेदार आहेत त्यांचे तीन ते चार वर्षापासुन बिलेही देण्यात आलेली नाहीत. लवासा पार्किंग शुल्क ही बाब मुठा आणिमोसे खोऱ्यातील विविध भागातील हॉटेल चालक व नागरिकांसाठी समस्या बनत चालली आहे.
     चौकट :-
 1) लवासाने पार्किंग शुक्ल आकरणे सुरू केल्याने पर्यटक याभागात येणे कमी झाले आहे. त्यामुळे  हॉटेल बंद करावेसे वाटू लागले आहे. पूर्वी सुट्टीच्या दिवशी रोज अडीच ते तीन हजार रुपयांचा धंदा व्हायचा.परंतु पर्यटक कमी झाल्याने आता सहाशे ते सातशे रुपये पण नीट मिळत नसल्याचे आंदगाव येथील समर्थ हाँटेलचे मालक सचिन मारणे यांनी सांगितले.
2) पार्किंग शुल्काच्या नावाखाली येणाऱ्या पर्यटकांकडून लवासाच्या बाहेरच जबरदस्तीने वसूली केली जात आहे. यामुळे पर्यटकांनी मुळशी धरण किंवा इतरञ जाणे पसंत केले असून मुठा खोरे व लवासा भागातील व्यावसायिकांचे जगणे कठीण झालेले आहे. तरी लवासाकडून आकारण्यात येत असलेले अवाजावी पार्किंग शुल्क बंद करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया भाजयुमोचे कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी दिली.
फोटोओळ : लवासाच्या बाहेरच वाहनचालकाकडून जबरदस्तीने वसूल केला जात असलेला पार्किंग शुल्क.

Post a Comment

 
Top