Add

Add

0
    कारगिल दिनानिमित्त  शहीद सैनिकांना कोकण भवन येथे मानवंदना 

 

नवी मुंबई (प्रतिनिधी ): - कारगिल विजय दिनानिमित्ताने कोकण भवन. बेलापूर, नवी मुंबई येथे एन.सी.सी कॅडेटद्वारे कारगिल युध्दात शहीद झालेल्या सैनिकांना आज मानवंदना देण्यात आली. यावेळी विभागीय महसूल आयुक्त श्री.शिवाजीराव दौंड, राज्यकर सहआयुक्त, वस्तू व सेवाकर, भवन, रायगड विभाग श्री.शिवाजी केनवडेकर, राज्यकर सहआयुक्त श्री.रमेश बी.जैद, उपायुक्त (पुरवठा) शिवाजी कादबाने, उपायुक्त (नियोजन) श्री.बा.ना.सबनीस, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, शासकीय पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष श्री.अजित न्यायनिरगुणे  यांनीही उपस्थित राहून मानवंदना दिली. 
यावेळी कोकण विभागातील आजी व माजी सैनिक व अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहून शहीद सैनिकांना मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे आयोजन कोकण विभागीय अध्यक्ष अजित न्यायनिरगुणे व श्री.दिलीप अहिरे विक्रीकर अधिकारी, श्री.सुभाष टेकेकर, श्रीम.अश्विनी चौधरी, महेंद्र गवई, रघुनाथ पाटील, नायब तहसिलदार माधुरी डोंगरे, तसेच कोकण भवन येथील सर्व माजी सैनिक यांनी केले होते.

Post a Comment

 
Top