Add

Add

0

   डॉ.अमोल कोल्हे यांची ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका

                        लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..

मुंबई(प्रतिनिधी ):-खासदार अमोल कोल्हे यांची झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभा जी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.आता त्यांची नवी मालिका ‘स्वराज्यजननी जिजा माता’ येत्या 19 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबतचीमाहिती स्वत: अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली. या मालिकेची निर्मिती जगदंब क्रिएशनच करणार असल्याची माहिती कोल्हे यांनी दिली .शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली,जोपासली, आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाई मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर मालिकेच्या स्वरूपात लवकरच येणार आहे . ही नवी मालिका सोनी मराठीवर प्रसारित करण्यात येईल . ही मालिका तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाची हुंकार असेल,’ अशी पोस्ट अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर लिहिली.

Post a Comment

 
Top