Add

Add

0
मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संघटन कौशल्यामुळे
भाजपा अधिक मजबूत बनेल... 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

 मुंबई (प्रतिनिधी):- नवनियुक्त भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या पर्वाला सुरुवात झाली असून त्यांच्या संघटन कौशल्यामुळे सरकार व जनतेमधील संघटनेचा सेतू अधिक मजबूत बनेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत व्यक्त केला.
मा. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. नवनियुक्त मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले.
मा. देवेंद्र फडणवीस म्हणाले कीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने राज्यात प्रचंड विजय मिळवला तसाच विजय आगामी विधानसभा निवडणुकीत मिळवायचा आहे. राज्यात गेल्या पावणेपाच वर्षांच्या सत्तेच्या काळात महायुती सरकारने उद्योगआरोग्यशिक्षण अशा सर्व क्षेत्रात राज्य पहिल्या क्रमांकावर नेण्याचे काम केले आहे. या आधीच्या सरकारला पन्नास वर्षात जी कामे करता आला नाहीतती या सरकारने केली आहेत. जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी राज्यात पुन्हा सत्ता हवी आहे.
त्यांनी सांगितले कीमा. चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्याचे मंत्री म्हणून समर्थपणे विविध विभागांची जबाबदारी पेलली असून मेहनतीने त्या खात्यांचे काम राज्यात उभे केले. एक कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा आहे. पण त्यांचा मूळ पिंड संघटनेचा आहे. सामान्य कार्यकर्त्यांना जोडून घेऊन संघटन उभे करण्यात त्यांची हातोटी आहे. त्यांनी संघटनेच्या कामासाठी राज्यभर प्रचंड प्रवास केला आहे.
ते म्हणाले कीकेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी गेली साडेचार वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या कारकीर्दीत सरकार व संघटनेने सहयोगाने काम केले आणि संघटनेचा विस्तार झाला. आपण मा. रावसाहेब पाटील दानवे यांचे अभिनंदन करतो व त्यांचे आभार मानतो.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले कीआपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहकार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डानवनियुक्त राष्ट्रीय संघटनमंत्री संतोषजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा. रावसाहेब पाटील दानवे यांचा आपण आभारी आहोत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच एकजुटीने विधानसभा निवडणुकीत भाजपाशिवसेना व घटकपक्षांच्या महायुतीला विजयी करायचे आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवारांसोबतच महायुतीतील पक्षांच्या उमेदवारांच्या विजयासाठीही तेवढेच प्रयत्न करायचे आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी राहिलेली कामे पूर्ण करायची असून राज्यात पुन्हा मजबूत सरकार सत्तेवर आणायचे आहे.
मा. मंगलप्रभात लोढा म्हणाले कीमुंबई भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणे हा आपल्या आयुष्यातील सुवर्णक्षण असून त्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहकार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांच्या प्रयत्नाने युतीचा एकतर्फी विजय होईल.
यावेळी प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिकप्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती व प्रवीण दरेकरकामगारमंत्री व प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटेसरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर व आ. डॉ. रामदास आंबटकरप्रदेश सचिव संजय उपाध्याय,महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूरउद्योग राज्यमंत्री अतुल सावे,भाजयुमो प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकरआ. राज पुरोहितआ. तमिळ सेल्वन,भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईककिसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढेप्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारीप्रदेश प्रवक्ते केशव उपाध्येअतुल शाह व गणेश हाके उपस्थित होते.

Post a Comment

 
Top