Add

Add

0

मुख्यमंत्री – राम नाईक यांची चर्चा

मुंबई(प्रतिनिधी ):- उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल श्री. राम नाईक यांनी आज सकाळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री सांगलीला जाण्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी वर्षावर सदिच्छा भेट घेतली.  श्री. राम नाईक हे मूळचे सांगलीचे असल्याने सद्य पूर परिस्थिती बाबतची आपली चिंता त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.  तसेच या संकटसमयी सर्व संबंधितांना दिलासा मिळेल अशी उपाययोजना करण्याची विनंतीही केली.

राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर आज प्रथमच श्री. राम नाईक वर्षावर आल्याने मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले.  त्यानंतर श्री. नाईक यांनी फडणवीसांना राज्यपाल पदाचा शेवटचा – पाचवा कार्य अहवाल ‘राजभवन में राम नाईक 2018-19’ भेट दिला.  श्री. राम नाईक यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी पक्ष संघटनेत श्री. राम नाईक यांनी मार्गदर्शक म्हणून काम करण्याबाबत विस्ताराने चर्चा केली.

काही महत्त्वाच्या सामाजिक विषयांवरही उभय नेत्यांनी चर्चा केली.  यावेळी तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम तोडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या परिणामांबाबतही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व श्री. राम नाईक यांनी विचार विनिमय केला.


Post a Comment

 
Top