Add

Add

0
                        कौटुंबिक कलहाचे विदारक सत्य मांडणारा 
                         सामाजिक लघू चित्रपट "अर्थ स्वार्थ " 

मुंबई (प्रतिनिधी ):-आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत महेश्वर भिकाजी तेटांबे लिखित आणि दिग्दर्शित एका ज्वलंत समस्येवर आधारित मराठी सामाजिक लघू चित्रपट "अर्थ स्वार्थ " फेस्टिवल साठी सज्ज झाला आहे. मुंबईतील वास्तव्य असलेल्या हसऱ्या घरकुल मध्ये जेव्हा उत्तुंग इमारतीचा शिरकाव होतो तेव्हा पैशांसाठी भावाभावात होणारे वाद, वडिलोपार्जित संपत्ती साठी होणारी जिवघेणी भांडणे विकोपाला जातात आणि यांत भरडली जाते ती बुजुर्ग व्यक्ती जिने स्वतः  हालअपेष्टा आपल्या मुलांसाठी काढलेल्या असतात पण त्याचा मुलांना विसर पडलेला असतो, लहानपणी एकमेकांना जीव लावणारी भावंडे मोठी झाल्यावर केवळ पैशांसाठी , स्वार्थासाठी एकमेकांच्या जीवावर कशी उटतात आणि याचा शेवट काय होतो ते याचे विदारक चित्र "अर्थ स्वार्थ " या मराठी सामाजिक लघू चित्रपटांत आपणांस नक्की पहायला मिळेल...! 
या लघू चित्रपटांत सुप्रसिद्ध अभिनेते अनंत सुतार आणि अचला (माई) पांचाळ यांच्यासोबत रूपेश पालव , गणेश राजणकर , देवेंद्र पवार , वनिता गरुड , मानसी परब , रवीना सोनावणे , विशाल म्हसकर , सचिन सावंत , रघुनाथ खजूरकर यांचा सहभाग असून सहदिग्दर्शन राम माळी यांचे आहे.आणि संकलन आणि संगीत सुनील म्हात्रे (अनुष्का रेकॉर्डिंग स्टुडिओ ) यांचे लाभले असून एकंदरीत हा लघू चित्रपट सध्याच्या परिस्थितीवर बेतला आहे.

Post a Comment

 
Top