Add

Add

0
कलाकार आणि डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त 
करण्यासाठी ‘संजीवनी’ मालिकेच्या

मुंबई (प्रिया कदम ):- खास प्रदर्शनापासून नव्या ‘# थँक्यूडॉक्टर’ मोहिमेस प्रारंभ!भारतीय टीव्हीवरील एक अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍्या ‘स्टार प्लस’वरील ‘संजीवनी’मालिकेला नव्या संचात लवकरच पुन्हा सादर केले जाणार आहे. पण प्रसारणापूर्वी या मालिकेसाठी कलाकार आणि डॉक्टर यांनी घेतलेल्या मेहनतीची दखल घेऊन त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी निर्मात्यांनी या मालिकेच्या एका खास प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या विशेष प्रदर्शनाचे कारण समाजातील डॉक्टरांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि लोकांच्या जीवनातील त्यांच्या योगदानाची दखल घेणे हे आहे. या खास प्रदर्शनाद्वारे निर्मात्यांनी ‘#थँक्यूडॉक्टर’ या नव्या मोहिमेचा प्रारंभ केला असून आणीबाणीच्या वेळी आपल्या ज्ञानाने रुग्णाचे प्राण वाचविणारे डॉक्टर हे एरवी अनामीच राहतात.
वेळोवेळी गरज लागेल तेव्हा आणि तातडीच्या परिस्थितीत या डॉक्टरांनी आपल्याला केलेल्या मदतीबद्दल सर्व कलाकार आपल्या फॅमिली डॉक्टरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या विशेष प्रदर्शनासाठी घेऊन आले होते. तातडीच्या वेळी डॉक्टरांची होणारी मदत हेच संजीवनी मालिकेचे सूत्र आहे. संजीवनी पुन्हा प्रसारित होत असल्याच्या वृत्तामुळे प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पण या प्रसारणाच्या दोनआठवडे आधी हा विशेष प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
आता 17 वर्षांनंतर ‘संजीवनी’ मालिका पुन्हा नव्या स्वरूपात प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर सखोल ठसा उमटविला होता आणि आता ही मालिका पुन्हा एकदा सुरू होण्याच्या वृत्तामुळे प्रेक्षकांमध्ये नव्याने उत्कंठा निर्माण झाली आहे. एका रुग्णालयातील डॉक्टरांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा वेध या मालिकेत घेण्यात आला होता. या डॉक्टरांचे जीवन हे आशावादावर कसे अवलंबून असते आणि हाच आशावाद ते आपल्या रुग्णांमध्ये कसा निर्माण करतात आणि त्यांना आपल्या वैयक्तिक जीवनापेक्षाही प्राधान्य कसे देतात, ते या मालिकेत दाखविले होते.
पूर्वीच्या मालिकेत भूमिका साकारणारे मोहनीश बहेल आणि गुरदीप कोहली यासारखे नामवंत कलाकार या नव्या संचातील मालिकेतही आपापल्या भूमिका साकारणार आहेत

Post a Comment

 
Top