Add

Add

0


           पथनाट्य ते दिग्दर्शक पर्यंतचा न थकणारा प्रवासी ...
                               महेश्वर भिकाजी तेटांबे

महेश्वर भिकाजी तेटांबे हे कोकणच्या सुगंधी मातीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या तालुक्यांत मौजे मांडकी या गावांत श्री परशुरामाच्या पवित्र भूमीत जन्मलेले नावाजलेले नाट्य, चित्रपट कलाकार, पत्रकार असून त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1971रोजी झाला. सुरुवातीला छं
द म्हणून जोपासलेली अभिनयाची आवड त्यांना व्यावसायिक रंगभूमी पर्यंत घेऊन गेली. तुझी ती माझी, गैरसमज, मु. पो. भांडेवाडी, गाभारा, आता होती गेली कुठ,जो तो खुर्चीत पडला मुर्छित, पेटला वंशाचा दिवा, चोर चोर चाळीत चोर, बुवा तेथे बाया,स्वप्न अंधाराचे, गाढवाचे लग्न,दिवा पेटे दिनरात, शापित गंधर्व इत्यादी व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी त्याना मिळाली. सोबत मराठी मालिका मध्येही अभिनय करण्याची संधी त्याना मिळाली. यात तिसरा डोळा, दामिनी, बंदीनी, आभाळमाया, डिटेक्टिव जयराम, कुंडली, क्राइम डायरी, कळत नकळत, चार दिवस सासुचे, क्राइम वाच, छत्रपती शिवाजी महाराज,पुढच पाऊल,स्वप्नांच्या पलीकडले या अतिशय गाजलेल्या मालिकांचा समावेश आहे. या सोबत सिने क्षेत्रातही श्री. महेश्वर भिकाजी तेटांबे यानी भूमिका केल्या आहेत. त्याचबरोबर मराठी व हिंदी पथ नाटकात ही त्यांचा सक्रिय सह भाग आहे. त्यात गजप्रभा कलामंच प्रस्तुत 'जीव वाचवा लाखाचा', ओम कलामंच चे 'कर भरा तो हो भला','पाणी पुरवठा', 'थेंब थेंब' यांचा समावेश आहे.श्री. महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी नाट्यलेखन ही केले असून आमची शाळा, चाळ नावाची वाचाळ वस्ती, पुरस्कार या एकांकिका लिहिल्या आहेत. त्यात त्यांच्या "पुरस्कार" या एकांकिकेला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत माझी बी आय टी चाळ, चांद मियां, सगुणाचि बाग , निवडणुक एक प्रणाली , मेड फॉर ईच अदर , ऊँची उड़ान ,चेटकिनि इत्यादी लघु चित्रपटांचे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शनही केले आहे त्याचबरोबर " *आस*  आणी " *अर्थ -स्वार्थ...* या दोन लघु चित्रपटाचे दिग्दर्शन आणी छाया चित्रण सूद्धा केले आहे. तसेच सोशल मीडियावर आधारित हिंदी लघु चित्रपट " *गुमसुम* " याचे प्रमुख दिग्दर्शन साहाय्य म्हणून कार्यरत. श्री.महेश्वर भिकाजी तेटांबे केवळ कलाकार नसून मुक्त पत्रकार, वृत्तपत्र लेखक आहेत. गेली २२ वर्ष विविध दैनिकातून त्यांनी जनतेच्या समस्या वर आवाज उठविला आहे. त्यांच्या कला, पत्रकारिता व समाज सेवा कार्याची द्खल घेऊन त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या पुरस्कारात *बाळशास्त्री जांभेकर* राज्य-स्तरीय पुरस्कार, *महाराष्ट्र दीप* पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार, पत्र लेखक पुरस्कार, पत्र महर्षी पुरस्कार, जागृत पत्रलेखक पुरस्कार, साद सांगाती पुरस्कार,पत्रमित्र पुरस्कार,समाजगौरव पुरस्कार, व इतर अनेक सन्मान चिन्ह व प्रमाण पत्रांचा समावेश आहे.अखिल भारतीय मराठी चित्र पट महा मंडळाचे ते सभासद असून “ *अ* ” वर्गाचे अभिनेते आहेत.,“ *ब* ” वर्गाचे लेखक आहेत आणी “ *अ* ” वर्गाचे दिग्दर्शक आहेत. त्याचप्रमाणे नुकताच त्यांच्या यशस्वी कार्याबद्दल तेटांबे यांना यावर्षीचा " अचूकवार्ता संपादकीय 2019" पुरस्कार माननीय पत्रकार श्रीयुत सुभाष आचरेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलात्याचबरोबर सध्याच्या युगातील वेब सिरीज वर ही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे त्यात प्रामुख्याने “तिरंगा, देशाभिमान” ,”व्हॅलेन्टाईन डे, गिफ्ट, “, किन्नर एक संभावना”, आणि “बहन” इत्यादी सारख्या अनेक *वेब सिरीज* चे त्यांनी दिग्दर्शन सुद्धा केले आहे .महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघ व मराठी वृत्त पत्र लेखक संघाचे ते आजीव सदस्य आहेत.
फावल्या वेळेत गायन व वादन करण्याचा त्यांचा छंद आहे. सध्या त्यांचा" पुरस्कार " या एकांकिकेवर आधारित सिनेमा दिग्दर्शित करण्याचा मानस आहे.
संपर्काचा पत्ता  
7/52, दिग्विजय मिल चाळ , 
काळाचौकी , मुंबई - 400033
 *आर्यारवी एंटरटेनमेंट* 
मोबाईल नंबर : 9082293867

Post a Comment

 
Top