Add

Add

0
हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ ! 
विविध माध्यमातून व्यापक स्तरावर प्रबोधन करण्यास प्रारंभ ! - पराग गोखले 

  पुणे (प्रतिनिधी ):- राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! मात्र याचे स्मरण केवळ 15 ऑगस्ट आणि26 जानेवारीया दिवशी होते.यादिनी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात.हेच कागदी / प्लास्टिकचे छोटे छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी सायंकाळपासून रस्त्यावरकचर्‍यातगटारात आदी ठिकाणी पडलेले आढळतात.प्लास्टिकचे ध्वज तर लगेच नष्टही होत नाहीत,त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या 16 वर्षांपासून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ या चळवळीद्वारे प्रबोधन करत आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे येथे विविध शासकीय अधिकाऱ्यांना या विषयी निवेदन देण्यात आले.  

           राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही करू ! - नवलकिशोर रामजिल्हाधिकारीपुणे 

  स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी  न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावीया आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना 29जुलै या दिवशी देण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर रामयांनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही नक्की करूअसे आश्वासन दिले.
  याच प्रमाणे आजपर्यंत अन्य ठिकाणी निवेदने दिली. रघुनाथ जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षकहडपसर पोलीस ठाणे )रवींद्र रसाळ(सहाय्यक पोलीस आयुक्तविशेष शाखापुणे शहर).शिरवळ पोलीस ठाण्याचे अंमलदार सौ.आर.एस.देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी,कोथरूड पोलीस स्टेशन,वारजे पोलीस स्टेशन,श्री सुनील कलगुटकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षकविश्रामबाग पोलीस ठाणे.)श्री किशोर नावंदे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस ठाणे.)श्री जाधव साहेब (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे) 
अण्णासाहेब आवटे विद्यालय,जुन्नर, जुन्नर नगरपरिषदेच्या 2 शाळा आणि पुणे येथील 8 शाळांमध्ये हे निवेदन देण्यात आले आहे. 
पुणे महानगरपालिकेचे सदस्य महेश वाळिंबेअश्विनी कदमप्रसन्नदादा जगतापआनंद रिठेशंकर पवारज्योती गोसावीअश्विनी पोकळे, यानांही निवेदन देण्यात आले. 
सर्वानीच सहकार्य करतो असे सांगितले.हे निवेदन देण्यासाठी धर्मप्रेमी अशोक केडगेश्री. हनुमंत आंबेवाडीकररणरागिणी शाखेच्या कु.क्रांती पेटकरहिंदु जनजागृती समितीचे श्री.पराग गोखले,कृष्णाजी पाटील पुढाकार घेतला यामध्ये हिदुत्व निष्ठांचाही सहभाग लाभला होता.


Post a Comment

 
Top