Add

Add

0
          मा.गौरव शिंदे यांची देवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणुन नियुक्ती ..! 

मुंबई (प्रतिनिधी ):- देवसेवा प्रतिष्ठान बदलापुर ही संस्था सातत्याने अनाथाश्रम मधील गोरगरीब अनाथ मुलांना नियमितपणे लागणाऱ्या वस्तू  वह्या, पेन ,दप्तर, गणवेश तसेच वृद्धाश्रम मधील व्रुध्दांना लागणारे कपडे आणि इतर निकडीच्या वस्तु पुरवते इतकंच नव्हे तर देवसेवा प्रतिष्ठान व त्यांचे संस्थापक अध्यक्ष माननीय देविदास सोनावणे आणि त्यांचे पदाधिकारी हे मागील 1 वर्षापासुन 9 जिल्ह्यात सक्रिय काम करत आहेत. अशा या सेवाभावी संस्थे तर्फे महाराष्ट्र राज्य , कलाश्रम - 
कलाक्षेत्र ह्या विभागासाठी "अध्यक्ष" म्हणुन प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक माननीय गौरव शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून ते बदलापुर मध्ये अल्पावधीतच अनाथाश्रम,वृद्धाश्रम,महीलाश्रम आणि कलाश्रम असे भव्यदिव्य चार आश्रम एकत्र बांधण्यात येणार आहेत.अशी विश्वसनीय माहिती दिली आहे.

Post a Comment

 
Top