Add

Add

0
           पुणे पोलीस व खाजगी सुरक्षा रक्षक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने 
पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ हा कार्यक्रम साजरा 
 
पुणे (प्रतिनिधी ):- दिनांक 9 ऑगस्ट 2019 रोजी पोलीस आयुक्त,डॉ.के.वेंकटेशम (भापोसे),पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे (भापोसे),अपर पोलीस आयुक्त( गुन्हे )अशोक मोराळे (भापोसे), पोलीस उपआयुक्त गुन्हे बच्चन सिंग (भापोसे),अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. संजय शिंदे ( मपोसे), तसेच भारत शिल्ड  फोर्सचे संस्थापक सचिन मोरे व महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक सेवा पुरवठादार संस्थेचे मालक आणि चालक कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते.
पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-4 हा कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक मा. अजित लकडे समन्वय अधिकारी यांनी केले.माय गेट आणि भारत शिल्ड  फोर्स च्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन  स्वागत करण्यात आले. यावेळी आपल्या मनोगतात सचिन मोरे यांनी सांगितले  कि,  जगाच्या  नकाशावर पुणे हे खूप वेगाने विकासाच्या दिशेने वाढणारे शहर असल्याने  आय. टी. कंपन्या, मेट्रो, स्मार्ट  सिटी होत असतानाच  अद्ययावत अशा  प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांना  पोलिसांशी मैत्रीचे संबंध तयार करून एक आदर्श सुरक्षा प्रणाली विकसित होणे गरजेचे आहे. पी-4 उपक्रमामुळे गुन्ह्याचे प्रमाण रोखण्यास मदत होईल आणि वेळोवेळी पोलीस प्रशासनाला मनुष्यबळ गरजेच्या वेळी सुरक्षा रक्षक संस्थेचा वतीने योग्यती मदत केली जाईल.
तसेच सेवा निवृत्त कर्नल गुरमीत  सिंग गिल यांनी या उपक्रमा बाबत पुणे पोलीस दलाची स्तुती केली आणि प्रत्येक सुरक्षा रक्षक संस्थेच्या मालकांनी शासनाच्या नियमा प्रमाणे काम करताना जनतेची सेवा करावी आपत्कालीन व्यवस्थेमधे आम्ही पोलिस प्रशासनाचा पाठीशी आहोत अशा भावना व्यक्त केल्या. 
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे )अशोक मोराळे(भापोसे) यांनी आपल्या मार्गदर्शनात खाजगी सुरक्षा रक्षक हे गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, मॉल,हॉटेल अँड रेस्टोरंट-पब,सर्व प्रकारची दुकाने,आय टी कंपनी,खाजगी बंगले, बँक- ए.टी.एम,सर्व प्रकारची ऑफिस,हॉस्पिटल, शाळा,कॉलेज, उद्याने,सार्वजनिक पे अँड पार्क पार्किंग, कॉमे र्सिअल कॉम्प्लेक्स, ज्वेलरी शॉप,बिग बाजार, डी मार्ट, सिनेमा गृह,शासकीय निमशासकीय संस्था, सरकारी कार्यालय, कारखाने, औद्योगिक वसाहत, विविध बाजारपेठ इ.ठिकाणी काम करतात त्यांनी पोलिसांचे खासदूत म्हणून काम केल्यास मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांवर आळा बसू शकतो आणि जे गुन्हे घडले त्यांच्या तपासाला चालना मिळू शकते. पोलीस स्टेशन आणि सुरक्षा रक्षक यांचे  120व्हॉटअँप ग्रुप तयार करून संपूर्ण शहरात 21 हजाराहून खाजगी रक्षक जोडण्यात आले आहेत.
मा. पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे (भापोसे) यांनी सर्व मालकांना कायदेशीर बाबी समजावून सांगून या उपक्रमाचे महत्व पटवून दिले. सुरक्षा रक्षक संस्थेचे मालकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन सर्वांची मने जिंकली व या पुढे कोणत्याही मालकांना काहीही गरज भासल्यास आम्ही शंकेचे आणि समश्येचे निराकरण करण्यास सदैव तयार आहोत असे मत व्यक्त केले.
मा.पुणे पोलीस आयुक्त,डॉ.के.वेंकटेशम (भापोसे)यांनी पुणे पोलीस भारतात कशा प्रकारे स्मार्ट आणि कर्तव्य दक्ष आहे हे उपस्थितांना उदाहरणातून समजावून सांगितले तसेच भविष्यकाळात पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ या उपक्रमाच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणावर पुणे सुरक्षित करण्यावर भर दिला जाईल आणि  शहरातील कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याकरीता नागरिकांची जारुकता आणि सहकार्याची अपेक्षा त्यावर त्यांनी भर दिला तसेच सर्व कामकाज गतिमान करण्यासाठी ऑनलाईन सुविधा असणार आहे. शहरात कोठेही काहीही झाल्यास 100नंबर प्रमाणेच 8775283100व्हॉटअँप नंबर वर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.जे विनापरवाना सिक्युरिटी एजेन्सी चालवतात अशा चालक व मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच सिक्युरिटी एजेन्सीच्या परवान्याकरिता पैशाची  मागणी होत असल्यास माहिती द्यावी त्यावर कठोर कारवाई केली जाईल,15ऑगस्ट  नंतर सुरक्षा रक्षकाला योग्य कागदपत्रांची पूर्तता  केल्यास ५ दिवसात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळेल, सुरक्षा रक्षक संस्थेचे मालकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन सर्वांना शुभेछया दिल्या.पुणे गुन्हे शाखेच्या वतीने आभारप्रदर्शन करण्यात आले.

Post a Comment

 
Top